महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image देश लोकप्रिय बातम्या

रेल्वेरुळ प्रकल्प लवकर पूर्ण करण्याला भारतीय रेल्वेचे प्राधान्य

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय रेल्वे लॉजिस्टिक विभागाचा खर्च कमीत कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय रेल्वे अलीकडे  रेल्वे रुळांशी संबंधित रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांना मोठी चालना दिल्यामुळे  प्रगतीचा एक कल स्पष्टपणे दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल-सप्टेंबर (आतापर्यंत) या कालावधीत रेल्वे रुळ प्रकल्पांची प्रगती- (नवीन लाईन्स टाकणे, गेज रूपांतरण आणि मल्टी-ट्रॅकिंग (दुप्पट/तिप्पट करणे)) जवळजवळ तीपटीने अधिक आहे.

या आर्थिक वर्षात 21 सप्टेंबर 2022 पर्यंत, रेल्वेने 1353 ट्रॅक किलोमीटर (टीकेएम) लांबीचे नवीन लाईन्स, गेज रूपांतरण आणि मल्टी ट्रॅकिंग प्रकल्प पूर्ण केले आहेत. सप्टेंबर महिन्यातच आणखी 150 टीकेएम जोडले जाण्याची शक्यता आहे. एकत्रित आकडा गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील आकडेवारीच्या तिप्पट आहे. गेल्या वर्षी, 30 सप्टेंबर 2021 पर्यंत 482 टीकेएम पूर्ण झाले.

2022-23 मध्ये, 2022-23 मध्ये नवीन लाइन/दुहेरीकरण/गेज रूपांतरणासाठी वाटप केलेले एकूण कॅपेक्स रु. 67000 कोटी (बिइ), ऑगस्ट २०२२ पर्यंतचा वास्तविक खर्च रु. 20075 कोटी. 2021-22 मध्ये, 2021-22 मध्ये नवीन लाइन/दुहेरीकरण/गेज रूपांतरणासाठी वाटप केलेले एकूण कॅपेक्स रु. 45465 कोटी (बीइ), ऑगस्ट 2021 पर्यंतचा वास्तविक खर्च रु. 15,281 कोटी होता.

विशेष म्हणजे, नवीन लाईन/दुहेरीकरण/गेज रूपांतरण यामध्ये, 2021-22 मध्ये 2400 किमीचे लक्ष्य पार करुन त्या पलीकडे  2904 किमीचे लक्ष्य गाठले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×