Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image लोकप्रिय बातम्या विदेश

भारतीय नौदलाचे तरकश जहाज सातव्या संयुक्त सागरी सरावासाठी दक्षिण आफ्रिकेत

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय नौदलाचे आयएनएस तरकश  हे जहाज 10 ते 12 ऑक्टोबर 2022 दरम्यान होणाऱ्या भारतीय, ब्राझिलियन आणि दक्षिण आफ्रिकेच्या नौदलांमधील सातव्या  IBSAMAR  संयुक्त बहुराष्ट्रीय सागरी सरावात सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील ग्रीकुरिया (पोर्ट एलिझाबेथ) येथे पोहोचले.

सहावा IBSAMAR सराव 1 ते 13 ऑक्टोबर 2018 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेतील सायमन्स टाउन येथे आयोजित करण्यात आला होता.भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व तेग श्रेणीचे  क्षेपणास्त्र फ्रिगेट, INS तरकश, चेतक हेलिकॉप्टर आणि मरीन कमांडो फोर्सचे कर्मचारी करत आहेत.

IBSAMAR VII च्या बंदरावरील टप्प्यात व्यावसायिक देवाणघेवाण, जसे की क्षति नियंत्रण आणि अग्निशमन कवायती, व्हीबीएसएस (VBSS)/क्रॉस बोर्डिंग व्याख्याने आणि सैन्यांमधील परस्परसंवाद यांचा समावेश आहे.संयुक्त सागरी सरावामुळे सागरी सुरक्षा , संयुक्त परिचालन प्रशिक्षण, सर्वोत्कृष्ट पद्धतींची देवाणघेवाण आणि समान सागरी धोक्यांना तोंड देण्यासाठी आंतरकार्यक्षमता निर्मिती मजबूत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X