महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी यशोगाथा

भारतीय गिर्यारोहकानी युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस केले सर,१८ हजार फूट उंचीवर झळकले तिरंग्यासह संविधान

विशेष /अशोक कांबळे – युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस सर करीत चार भारतीय गिर्यारोहकानी 18 हजार फूट उंचीवर तिरंग्यासह संविधान झळकावून इतिहास घडविला आहे. ही मोहोम 360 एक्सप्लोरर मार्फत राबवण्यात आली होती.या गिर्यारोहकानी कोव्हिडनंतरची पहिली मोहीम यशस्वी करण्याचा मान मिळवला आहे.या मोहोमेत मध्य प्रदेशातील ज्योती रात्रे,दिल्ली येथील अजय कुमार ,हुकूमत चंद व महाराष्ट्रातून अनिल वसावे सहभागी झाले होते.या भारतीय गिर्यारोहकानी युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस सर करून 18 हजार फूट उंचीवर तिरंग्यासह संविधान झळकावून इतिहास रचला आहे.

महाराष्ट्रातील अनिल वसावे याने शिखरावर तिरंग्यासह संविधान झळकावून आगळावेगळा इतिहास निर्माण केला.8 जुलै रोजी पहाटे युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस वर तिरंगा फडकवून शिखर सर केले.माऊंट एलब्रूस हे युरोपातील सर्वोच्च शिखर आहे.या शिखराची उंची 18 हजार 510 असून काळा समुद्र व कँस्पियन समुद्राच्या मध्ये हे शिखर आहे.जॉर्जिया देशाच्या बॉर्डर पासून 20 किमी अंतरावर माऊंट एलब्रूस शिखर असून निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे.याचे तापमान उणे 25 डिग्री पर्यंत असते.वर्षभर येणारी सततची वादळे,रक्त गोठवणारी थंडी आदी माऊंट एलब्रूस चढाईतील अडचणी आहेत.

360 एक्सप्लोरर या टीमने ही मोहोम आयोजित होती.कोरोनानंतरची पहिलीच मोहोम एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे मार्गदर्शखाली यशस्वी करण्यात आली.360 एक्सप्लोरर टीम जगभर अनेक साहसी मोहिमांचे आयोजन करते.या टीमने गेल्या पाच वर्षात अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत. या मोहोमा अतिशय अवघड आव्हानात्मक असून त्याचे योग्य नियोजन करीत 360 एक्सप्लोररच्या सदस्यांनी माऊंट एलब्रूस शिखर सर केले.शिखर सर करणाऱ्या मध्यप्रदेश येथील ज्योती रात्रे ह्या सर्वात जास्त वयस्क महिला ठरल्या आहेत.त्यांनी वयाच्या 52 व्या वर्षी माऊंट एलब्रूस शिखर सर केले आहे.चार भारतीय गिर्यारोहकानी 360 एक्सप्लोरर मार्फत भारताचे संविधान शिखरावर नेहून 2014 मध्ये मी केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×