नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण हे एक महत्वाचे रेल्वे स्थानक असल्यामुळे या परिसरात नागरिकांची २४ तास या भागात नागरिकांची मोठी वर्दळ सुरु असते. कल्याण एस. टी. डेपो, रिक्षा स्टॅन्ड परीसरात काही बांगलादेशी महिला संशयित रित्या फिरत असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलीसांच्या पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचून भारतात विनापरवाना प्रवेश केलेल्या ५ बांगलादेशी महिला नागरीक तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या एका भारतीय नागरीकाला अटक केली आहे. लुथफा बेगम जहाँगीर आलम ( वय ४६ वर्षे, रा.नारकिल्ला, ता.शाल्ला, जि. सोनमगंज, बागलदेश,) जोरना जलालमियाँ अख्तार (वय २३) मासुमा जमीरउद्यीन (वय २०, रा. शोरालीतुफा, ता. धीराई, जि. सोनमगंज, बांगलादेश) अल्पवयीन १५ वर्षीय मुलगी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर रघुनाथ उदय मंडल असे आश्रय देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्यालाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन, पश्चिम परिसरात काही बांगलादेशी महिला संशयास्पदरित्या वावरत असल्याबाबत पोउनि प्रतिभा माळी यांना बातमी दारामार्फत माहिती मिळाली होती. या बातमीची खातरजमा करणेसाठी वपोनि. अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रदिप पाटील, मपोउनि प्रतिभा माळीसह पोलीस पथकाने स्टेशन परीसरात बांगलादेशी महीलांचा शोध घेत असताना सायंकाळच्या सुमारास एस.टी. डेपो, रिक्षा स्टॅन्ड परीसरात ५ महिला, १ पुरुष इसम हे संशयास्पद स्थितीत फिरतांना आढळून आले. त्यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेवुन महिलाकडे पोलीस पथकाने चौकशी केली असता त्यांना हिंदी , मराठी अशी कोणतीच भाषा समजत नसल्याने त्या बोलत नव्हत्या. त्यानंतर त्यांच्याकडे भारताचे नागरीक असल्याबाबतचे पुराव्याचे कागदपत्राबाबत विचारणा केली असता ५ महिलांपैकी ३ मोठया महिला व एक अल्पवयीन मुलगी या बांगलादेशी नागरीक असल्याचे तसेच एक महिला व तिचे सोबत असलेला व्यक्ती हे पती पत्नी असल्याचे समोर आले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेला रघुनाथ उदय मंडल व त्याची पत्नी रितीका रघुनाथ मंडल यांनी मोठ्या महिला व एक अल्पवयीन मुलगी हया बांगलादेशी नागरीक आहेत याची माहीती असताना देखील त्यांचे बाबत पोलीसांना माहीती न देता त्यांना आश्रय दिला आहे. त्यामुळे बांगलादेशी महिला नागरीक व त्यांना आश्रय देणारा भारतीय नागरीक यांचे विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० परिच्छेद ३(१), परकिय नागरीक आदेश १९४८ ३(१), परकिय नागरिक कायदा १९४६ कलम १४ व परिच्छेद २ परकीय नागरीक आदेश १९७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.