महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
देश लोकप्रिय बातम्या

भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव फ्रिंजेक्स-२०२३ चे तिरुअनंतपुरम येथे आयोजन

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

केरळ/प्रतिनिधी – केरळमधील तिरुअनंतपुरम येथील पानगोडे लष्करी तळावर 07 आणि 08 मार्च 2023 रोजी भारतीय आणि फ्रेंच लष्करा दरम्यान फ्रिंजेक्स-23 हा पहिला संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जाईल. तिरुअनंतपुरम स्थित भारतीय सैन्य दल आणि फ्रेंच 6व्या लाइट आर्मर्ड ब्रिगेडमधील पलटणीचा समावेश असलेली तुकडी या स्वरूपामध्ये दोन्ही देशांचे सैन्य प्रथमच सहभागी होत आहे.

दोन्ही सैन्यांमधील आंतर-कार्यक्षमता, समन्वय आणि सामरिक पातळीवर सहकार्य वाढवणे हे या सरावाचे उद्दिष्ट आहे. संयुक्त मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण, अंतर्गत विस्थापित लोकसंख्या (IDP) शिबिराची स्थापना आणि आपत्ती निवारण सामग्रीचे वहन करण्याकरिता संकल्पित क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी संयुक्त कमांड पोस्टची स्थापना आणि कार्यान्वयन करण्यासाठीही हा सराव होत आहे.

या संयुक्त सरावामुळे फ्रान्ससोबत संरक्षण सहकार्य अधिक दृढ होईल जे एकूणच भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीचा एक महत्त्वाचा पैलू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×