नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारत आणि सौदी अरेबियाने आज रियाध येथे वीज आंतरजोडणी , हरित/स्वच्छ हायड्रोजन आणि पुरवठा साखळी या क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारावर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले आलेले ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री अब्दुलअजीज बिन सलमान अल-सौद यांनी आज रियाधमध्ये मध्य पूर्व उत्तर आफ्रिका हवामान सप्ताह (MENA ) च्या निमित्ताने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
वीज आंतरजोडणी क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्यासाठी एक आराखडा तयार करणे आहे; मागणी अधिक असताना आणि आपत्कालीन परिस्थितीत विजेची देवाणघेवाण; प्रकल्पांचा सह-विकास; हरित/स्वच्छ हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जेची सह-निर्मिती ; आणि हरित/स्वच्छ हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात वापरल्या जाणार्या सामग्रीची सुरक्षित, विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळी स्थापित करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.
ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या वर-उल्लेखित क्षेत्रांमध्ये संपूर्ण पुरवठा आणि मूल्य साखळी प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान B2B उद्योग परिषदा आणि नियमित B2B परस्परसंवाद आयोजित केले जातील असा निर्णयही दोन्ही ऊर्जा मंत्र्यांनी घेतला.
तत्पूर्वी, केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने 8 ते 12 ऑक्टोबर 2023 दरम्यान सौदी अरेबियामधील रियाध येथे आयोजित मध्य पूर्व उत्तर आफ्रिका हवामान सप्ताह 2023 च्या उच्च-स्तरीय सत्रात भाग घेतला. आज रियाधमध्ये मध्य पूर्व उत्तर आफ्रिका हवामान सप्ताहाच्या पहिल्या दिवशी “पॅरिस कराराचे जागतिक हितधारक प्रादेशिक संवाद: महत्वाकांक्षा आणि न्याय्य आणि सर्वसमावेशक संक्रमण सक्षम करणारे तंत्रज्ञान” यावरील सत्राला संबोधित करताना केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्…
मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिका हवामान सप्ताहातील उच्च-स्तरीय GST (ग्लोबल स्टॉकटेक ऑफ द पॅरिस करार) प्रादेशिक संवाद या प्रदेशातील प्रमुख संदेशांवर चर्चा करण्यासाठी धोरण निर्माते, प्रमुख भागधारक आणि आंतरसरकारी प्रक्रियेतील भागीदारांना फलनिष्पत्ती बाबत सहमतीसाठी एकत्र आणेल. MENA च्या संदर्भात हवामान कृती आणि मदत वाढविण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्यासाठी आव्हाने, अडथळे, उपाय आणि संधी यावर चर्चा करण्यासाठी हा संवाद एक व्यासपीठ म्हणून काम करेल.