महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी देश

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्योगक्षेत्राशी संबंधित मजबूत भागिदारी अस्तित्वात येणार

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या नेतृत्वातील भारताच्या शिष्टमंडळाने न्यूझीलंडला भेट दिली. ही भेट 26 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत झाली. या भेटीत या शिष्टमंडळाने दोन्ही देशांमधील सध्याचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी अनेक रचनात्मक आणि परिणामाभिमुख बैठका घेतल्या. न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅकक्ले, न्यूझीलंडचे प्रभारी मुख्य अधिकारी तसेच परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार सचिव ब्रुक बॅरिंग्टन, भारत – न्यूझीलंड व्यापार परिषद [India-New Zealand Business Council (INZBC)]आणि 11 वी भारत-न्यूझीलंड संयुक्त व्यापार समिती [India New Zealand Joint Trade Committee (JTC) यांच्यात या बैठका झाल्या.

परस्परांच्या अर्थव्यवस्था आणि परस्पर पूरक व्यापार क्षेत्रात एकमेकांना अनेक संधी आहेत, तसेच व्यापार आणि एकमेकांच्या नागरिकांमध्ये परस्पर संपर्क वाढवण्याची मोठी संधी असल्यावर दोन्ही देशांनी या बैठकांमध्ये सहमती दर्शवली. यासोबतच या बैठकांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि परस्पर सहकार्याला चालना देण्यासाठी, परस्परांमधील आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी तसेच दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी, एकमेकांच्या नागरिकांमध्ये परस्पर व्यापार आणि उद्योगविषयक संपर्क वाढवून त्या माध्यमातून दोन्ही देशांमधील सध्याचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने महत्त्वाची ठरू शकतील अशा क्षेत्रांवरही प्राधान्याने चर्चा केली गेली.

या बैठकांमध्ये बाजारपेठांची उपलब्धता तसेच आर्थिक सहकार्याशी संबंधित प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, तसेच नवे उपक्रम हाती घेण्याच्या दृष्टीने उपलब्ध संधींवरही चर्चा केली गेली. द्विपक्षीय आर्थिक संवादासाठी मजबूत संरचनात्मक व्यवस्था उभारणे तसेच कृषी, अन्न प्रक्रिया, गोदामे आणि वाहतूक, वनीकरण तसेच वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमधील मुख्य व्यापार आणि आर्थिक मुद्द्यांच्या बाबतीतली सध्याची परस्पर भागीदारी अधिक सुलभ चालावी यासाठी कार्यकारी गट स्थापन करण्यावरही या बैठकांमध्ये चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे या बैठकांमध्ये किवी फळ उत्पादन क्षेत्रासह एकूणच फलोत्पादन क्षेत्रातील (गुणवत्ता आणि उत्पादकता, गोदांममध्ये सुयोग्य आणि सुनियोजित साठवणूक आणि त्यांची योग्य नियोजित वाहतूक) तसेच दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील परस्पर सहकार्याबद्दलही चर्चा झाली. हे कार्यगट स्थापन झाल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड नियमितपणे ठराविक कालांतराने या कार्यगटांच्या प्रगतीचा आणि त्यांनी केलेल्या शिफारशींचा आढावा घेतील.

या बैठकांमध्ये बाजारपेठांची उपलब्धता, बिगर-शुल्कासंबंधीचे अडथळे [non-tariff barriers (NTBs)] तसेच द्राक्षे, भेंडी आणि आंबा यासारख्या उत्पादनांसाठीच्या निर्जंतुकीकरण स्वच्छताविषयक तसेच वनस्पतींशी संबंधीत निर्जंतुकीकरण स्वच्छताविषयक उपाययोजना, सेंद्रीय उत्पादनांबाबतीतील परस्पर मान्य संचरनात्मक व्यवस्था, वाहनांसाठीची देशांतर्गत मानके समरूप असावीत यासाठी परस्पर मान्यता देण्याची सुलभ प्रक्रिया, या आणि अशा अनेक परस्पर हिताच्या द्विपक्षीय व्यापार विषयक मुद्यांवरही व्यापक चर्चा केली. दोन्ही देशांनी यासंदर्भातल्या समस्या संयुक्त व्यापार समितीअंतर्गतच्या प्रक्रियेनुसार परस्पर रचनात्मक संवाद आणि सहकार्याने सोडविण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही या बैठकांमधून केला.

Related Posts
Translate »