नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – बुलढाणा लोकसभेसाठी महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष एकूण 21 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. मात्र, बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यात तिहेरी लढत होत आहे.
सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. रविकांत तुपकर हे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. रविकांत तुपकर आणि त्यांची पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांनी आपल्या सावळा या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाहीमध्ये राजा बदलण्याची ताकद ही जनतेमध्ये असते. आयुष्यामधील पहिली निवडणूक मी लढतो आहे आणि जनतेचा मला भरभरून पाठिंबा मिळत आहे. जे चिन्ह मला मिळालं त्या चिन्हाचं बटन दाबताना मला आनंद मिळाला, खूप चांगलं वातावरण आहे. चटणी भाकरी खाऊन जनतेने माझा प्रचार केला. जनतेचे उपकार मी कधीही विसरणार नाही. जनतेनेच ही निवडणूक हाती घेतली आहे आणि जनतेचा विजय होणार आहे. तरुण-तरुणी, वृद्ध महिलांनी मतदानासाठी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आवाहन केले आहे.