नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
संभाजीनगर/प्रतिनिधी– वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने प्रादेशिक कार्यालयांतर्गत यंत्र चालकांचा अति कालीन कामाचा मोबदला बंद केल्याच्या निषेधार्थ आज जुबली पारखेतील कार्यालयासमोर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 2017 पासून मराठवाड्यातील तिन्ही परिमंडळात कार्यरत यंत्र चालकांचा अधिक कालीन कामाच्या मोबदल्याबाबत तत्कालीन सह व्यवस्थापकीय संचालकांनी एक परिपत्रक काढले होते. मात्र शासनाने त्यांच्या या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ घेऊन मराठवाड्यातील सर्व यंत्र चालकांचा अति कालीन मोबदलाच बंद केला आहे. असे संघटनेच्या वतीने संगण्यात आले. त्याकरिता आज या ठिकाणी उपोषणाला बसले असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सचिव शेख मुजीब रहमान यांनी सांगितले.जादा कामाचा मोबदला मिळावा ही उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.