नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – महाराष्ट्र पोलिस नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच 24 तास तैनात असते. त्यामुळेच राज्यातील जनता ही सुरक्षित आहे. आता याच पार्श्वभूमीवर कल्याणातील कोळशेवाडी पोलिसांनी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. ठाणे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलिसांनी ‘माझे ठाणे सुरक्षित ठाणे’ हा पायलट प्रोजेक्ट राबवण्यास सुरुवात केली आहे.
या पायलेट प्रोजेक्ट अंतर्गत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 100 संवेदनशील ठिकाणी ज्यामध्ये बस स्टॅन्ड, रेल्वे स्टॅन्ड, पुतळे आहे, काही ठिकाणी दोन समाजामध्ये तनाव असेल महिलांना असुरक्षित वाटेल अशा काही जागा आहेत एकूण 100 जागांवर पोलिसांनी काही फिक्स पॉईंट्स केलेले आहे. जे फिक्स पॉईंट्स आहेत त्या सर्व ठिकाणी बीट मार्शल आणि पेट्रोलिंग मोबाईल तसेच कर्मचारी हे त्या ठिकाणी जाऊन चेक करणार आहे. पोलिस त्या परिसरातील परिस्थितीचा फोटो, त्याबरोबर स्वतःचा सेल्फी टाकतील त्यामुळे ज्या लोकेशनला त्यांना पाठवलेला आहे त्या ठिकाणची आत्ताची परिस्थिती काय आहे ते दिवसातून पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजत राहील. पोलीस कर्मचाऱ्यांना दिवसातून एकदा आणि रात्रीतून एकदा असं दोन वेळा भेट द्यायचे आहे. या संदर्भात कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी माहिती दिली.