Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ताज्या घडामोडी बिझनेस

उन्हाच्या तडाख्यात बाजारात लिंबाच्या दरात वाढ

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – राज्यभर उन्हाच्या तडाखा वाढतआहे. या तडाख्यात शितपेय पिण्याकडे लहान मोठ्यांचा कल जास्त असतो. त्यात जर गारेगार लिंबू सरबत मिळाला तर क्या बात है. पण या उन्हाच्या तडख्यात लिंबू महाग झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात सध्या लिंबूचे भाव हे वाढले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये लिंबूचे भाव हे दुप्पट झाले आहेत. आवक कमी असल्यामुळे भाव वाढ झाली असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मागील महिन्यामध्ये 60 रुपये किलोने लिंबू विकले जायचे. आता मात्र 120 रुपये किलोने विकले जातात. ऐन उन्हाळ्यामध्ये भाव वाढ झाल्याने ग्राहकांनी देखील पाठ फिरवली आहे. गेले काही दिवस लिंबूचे भाव मार्केटमध्ये वाढतच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X