नेशन न्यूज मराठी टीम.
पनवेल / प्रतिनिधी – पनवेल महापालिका हद्दीमध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये रुग्ण संख्येत जास्त वाढ झाली आहे.नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये मलेरियाचे 42 रुग्ण सापडले तर डेंग्यूचे 126 रुग्ण सापडले होते . डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही 20 ने वाढलेली आहे. पावसाळ्यामध्ये जागोजागी पाणी साचल्यामुळे मलेरिया,डेंग्यूचे रुग्ण हे वाढतात त्यामुळेनागरिकांना जर थंडी,ताप,खोकला अशी लक्षणे जाणवल्यास त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,आणि त्वरित रुग्णालयात उपचार घ्यावेत असे आवाहन पनवेल महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.