नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु असताना नाशिक जिल्ह्यात मात्र पावसाची रिपरिप सुरु होती. परतीचा पाऊस तरी सुखावणारा असणार आहे का हा नागरिकांना प्रश्न होता. अशातच मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यात हजेरी लावली आहे. इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठे व ब्रिटिश कालीन असलेले दारणा धरण 100 टक्के भरले असून तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे.
एका दिवसात पावसाची 136 मि.मी. नोंद झाली असून धरणाच्या 6 दरवाजातून 10 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. याच धरणाचे पाणी मराठवाड्यातील जायकवाडी येथील धरणाला जाऊन मिळते. यंदा पावसाने दडी मारली तरीही अधून मधून कोसळणाऱ्या मुसळधारेमुळे सरासरी गाठली जाते.