Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ठाणे पोलिस टाइम्स

ठाण्यात ‘हिट अँड रन’ च्या प्रकरणात वाढ,चार महिन्यात ३४ गुन्ह्यांची नोंद

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

ठाणे/प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक दिग्गजांच्या नावाने ठाणे शहराची ओळख आहे. मात्र आता ठाण्याची ओळख गुन्हेगारांचे ठाणे अशी करून द्यावी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. वाहतूक गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ हा नागरिकांच्या त्याचप्रमाणे पोलिसांच्या देखील चिंतेचा विषय ठरला आहे. ठाण्यात ‘हिट अँड रन’ च्या प्रकरणात वाढ झाल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारी ते 24 एप्रिल 2024 या कालावधीत हिट अँड रनच्या तब्बल 34 गुन्ह्यांची नोंद केली. या प्रकरणात आता पर्यंत एकूण 36 लोक दगावली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनायक राठोड यांनी दिली आहे. तसेच 1 हजार 45 केसेसना 40 लाख 85 हजार दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यात 26 केसेस अल्पवयीन चालकांकडून 1 लाख 30 हजार दंड वसूल करण्यात आला आहे.

परवाना नसेल तर मालकांवर आणि चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात 295 केसेस आहेत आणि त्यांच्याकडून 14 लाख दंड वसूल करण्यात आला आहे. ज्यावेळी शंका असते मद्यधुंद अवस्थेत काही विशिष्ट दिवसांमध्ये बाहेर निघतील त्यावेळी जास्तीत जास्त कारवाई करण्याचा प्रयत्न केला जातो. वेळोवेळी माहिती देत असतो की दारूचे सेवन करून गाडी चालवणे घातक असते इतर लोकांचे जीवन उद्ध्वस्त होतात. आई वडिलांनी देखील याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे ठाणे पोलीस उपायुक्त विनायक कुमार राठोड यांनी माहीती दिलीआहे.

Translate »
X