ठाणे प्रतिनिधी- आंबिवली परिसरातील धाम्मदीप नगर मधील झोपडपट्टीत राहणाऱ्या बिगारी काम करणाऱ्या भाऊसाहेब सिद्धार्थ आहिरे(३२) यांना आयकर विभागाने तब्बलएक कोटी पाच लाख अड्डतीस हजार रुपयाची नोटीस बजावली आहे त्यामुळे भाऊसाहेब व त्याच्या कुटुंबाच्या तोडचे पाणी पाळले आहे.
भाऊसाहेब हे नका कामगार असल्याने त्यांना आठवड्यातून जेमतेम तीन ते चार दिवस काम मिळते एक दिवसाची मजुरी ३५०रु अशी आहे. पत्र्याच्या घरात राहणारे हे कुटुंब पडेल ते काम करून आपल्या संसाराचा गाडा कसाबसा ओढतात.भाऊसाहेब याची पत्नी पापड लाटण्याचे काम करत आपल्या कुटुंबाला हातभार लावते. त्यात त्यांना दोन मुली व एक मुलगा हे पालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत.एकूण पाच जन असलेले कुटुंब कसेबसे आपले पोट भरते .
५ सप्टेंबर २०१९ रोजी कोटक महिंद्रा बँकेत नोटबंदी काळात ७८ लाख जमा केके म्हणून आयकर विभागाने त्याच्या कडून विवरण मागितले पण अशिक्षित असलेले भाऊसाहेबना काही कळले नाही त्यांनी त्याचाकडे दुर्लक्ष केले .पण नत्तर आयकर विभागाने चक्क नोटीस पाठवले नोटीस बघून भाऊसाहेब यांना भोवळ आली आणि त्यांनी स्थानिक लोकाच्या कानावर हि बाब घालून चौकशी केली आसता सदर भाऊसाहेब याच्या बोगस ओळख पत्राचा वापर करून कोणीतरी हा गैरकारभार केल्याचे समोर आले आहे. सदर भाऊसाहेब हे खूप घाबरून गेले आहे व त्यांनी त्याचा तक्रार अर्ज ग्रामीण पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड याच्याकडे दिला आहे.आणि मला योग्य तो न्याय मिळावा आशी मागणी केली आहे. पुढील चौकशी पोलीस करत आहे
Related Posts