नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – १० वे १५ जुलै दरम्यान केप टाउन, साउथ अफ्रिका येथे “किमुरा शुकोकाय इंटरनॅशनल जागतिक कराटे अजिंक्यपद स्पर्धा २०२३” आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी २२ देशातील ७०० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा कुमिते व काता या दोन क्रीडा प्रकारात खेळली जाणार असून भारत देशाचे प्रतिनिधीत्व किमुरा शुकोकाय इंडीयाचे प्रमुख प्रशिक्षक मोहन सिंग हे त्यांच्या १४ खेळाडुंच्या संघासह करीत आहेत. या खेळाडूंध्ये कल्याण, डोंबिवली, टिटवाळा येथील खेळाडूंचा समावेश आहे.
यामध्ये कल्याण डोंबिवलीतील रोहन सिंग, रितिका सिंग, संतोष पाटील, संजय कटोडे, जीवन ठाकूर, सानिका देशमुख, रिद्धी निनावे, साहिल कौल, फल्झान नजे, कुशल तिवारी या खेळाडूंचा तर टिटवाळा येथील विनायक मार्शल आर्ट आणि फिननेस झोनचे विनायक कोळी, राजरत्न साळवे आणि भूषण जाधव यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू मागील वर्षभर प्रमुख प्रशिक्षक मोहन सिंग यांच्या शास्त्रशुध्द मार्गदर्शनाखाली कुमिते व काता या दोन्ही क्रीडा प्रकारांचा सातत्यपूर्ण सराव करीत असून खेळाडुंना त्यांच्या यशाची खात्री आहे.