प्रतिनिधी.
कल्याण– कल्याण प्रभाग क्र ३ गंधारे हा मा.नगरसेवक सुनिल वायले व त्यांच्या पत्नी सौ.शालिनी वायले यांच्या कामामुळे नेहमीच विकास कामात अग्रेसर रहिला आहे. प्रभागात कोणतेही काम असो सुनिल वायले हे नेहमी हिरहिरीने त्या कामात सहभाग घेऊन ते काम पूर्ण करूनच सोडतात. प्रभागातील सामाजिक, शैक्षणिक, सास्कृतीक कोणतेही काम असो किवा कोणती समस्या त्यात त्यांचा सहभाग मोठा असतो. प्रभागातील नगर सेवक म्हणून नाही तर कुटुंबात आपला जसा सहभाग असतो त्या प्रमाणे ते प्रभागात सतत कार्यशील असतात.सौ. शालिनी वायले यांच्या नगरसेवक निधीतून आज दि.२७ डिसेंबर रोजी प्रभागातील पदपथ दुरुस्ती व त्याच बरोबर विविधकामाचे उद्घाटन मा.नगरसेविका शालिनी वायले, व सुनिल वायले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Related Posts