नेशन न्यूज मराठी टीम.
लातूर / प्रतिनिधी – शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये क्रिडा संस्कृती रुजवली गेली पाहिजे यासाठी विविध क्रीडा प्रकारांसाठीच्या स्पर्धा राज्य शासन अतंर्गत जिल्हा तसेच तालुका पातळीवर भरवल्या जातात. उदगीर येथे सध्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले.राज्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून राज्य शासन काम करत आहे.राज्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडण्यासाठी पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथेही क्रीडा विद्यापीठ स्थापन केले जाणार असून यासाठी 656कोटी रुपयांचा निधी दिला जाईल.तसेच राज्यातील खेळाडूंच्या मदतीसाठी ऑलिम्पिक भवन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पारंपारिक आदिवासी खेळांचा समावेशही क्रीडा प्रकारात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
क्रीडा विभागाने लक्षवेधी योजना जाहीर केल्या असून यामध्ये विविध 12 क्रीडा प्रकारांच्या विकासावर भर देण्यात येईल,असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.उदगीर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत राज्यातील 8 विभागांमधून 14 वर्षांखालील विविध गटातील 160 स्पर्धक सहभागी झाले आहेत.या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची विदिशा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड होईल.