नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
मुंबई – केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई संकुलात विद्यार्थ्यांसाठी ‘हॉस्टेल 17’ या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी वसतिगृह परिसरातील फलकाचे अनावरण आणि वृक्षारोपण देखील केले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उत्तम अनुभव मिळावा यासाठी गुणवंत विद्यार्थी, अभ्यासक्रम आणि प्राध्यापकांबरोबरच कॅम्पसचे वातावरण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. वातावरण सकारात्मकता निर्माण करते. जर तुम्ही सकारात्मक असाल तर तुम्हाला स्फूर्ती मिळेल. प्रत्येकामध्ये नवोन्मेष आणि योगदान देण्याची क्षमता असते. आज आपण आयआयटी मुंबई या महान संस्था आणि संकुलात एक नवीन पर्व सुरु केले आहे.
नवीन वसतिगृहात 1,115 खोल्या आहेत आणि आज उद्घाटन झालेली इमारत ही पहिल्या संचांपैकी एक आहे जी इमारत आयआयटी मुंबईने पूर्णपणे उच्च शिक्षण वित्त पुरवठा संस्थेच्या (HEFA) च्या निधीतून बांधली आहे. यासाठी अंदाजे 117 कोटी रुपये खर्च आला आहे.
आयआयटीमधून कर्मचारी नव्हे तर नियोक्ते आणि उद्योजक घडतील अशी अपेक्षा प्रधान यांनी यावेळी व्यक्त केली. आयआयटी मुंबईच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की, संस्थेचे प्रतिभावान विद्यार्थी रोजगार निर्माते म्हणून उदयाला येतील, जागतिक कल्याणासाठी कार्य आणि नाविन्यपूर्ण संशोधन करतील आणि एक मजबूत, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दिशेने देखील काम करतील.

आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाची प्रशंसा करताना प्रधान म्हणाले की, त्यांच्या कार्याचे उत्तम दस्तऐवजीकरण आणि प्रसार होणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, देशातील सहा मूळ आयआयटींनी मिळून जागतिक अर्थव्यवस्थेत 300 ते 400 अब्ज डॉलर्सचे योगदान दिले आहे. “आयआयटी मुंबई संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडणारा कधीही स्वार्थी असू शकत नाही. आपले माजी विद्यार्थी हे जगाच्या कल्याणाचा विचार करणारे आहेत. आपण आपल्या योगदानाचे अधिक चांगले दस्तऐवजीकरण करणे आणि आपल्या क्षमतेला उत्तेजन देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे आयआयटी मुंबईचे बलस्थान असल्याचे नमूद करून या क्षमतेचे नव्याने ब्रॅण्डिंग करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
वेगाने बदलणारे भू-राजकीय वास्तवाचे युग आणि महामारीमुळे उद्भवलेल्या जागतिक आव्हानांमुळे आपल्यासमोर अमाप संधी उपलब्ध झाल्या आहेत असे शिक्षण मंत्री म्हणाले. “आज आपण अनेक मोठ्या आव्हानांना सामोरे जात आहोत. महामारी आणि चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीसारख्या परिस्थितीचा आपल्याला सामना करावा लागत आहे. 2020 पासून गेल्या तीन वर्षांत आपण महामारीच्या तीन लाटा पाहिल्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन नवीन जागतिक व्यवस्थेत भारताला त्याचे योग्य स्थान मिळेल हे सुनिश्चित करण्यात आयआयटी मुंबई मोठी भूमिका बजावेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
21 वे शतक हे ज्ञानाचे युग असणार आहे आणि त्यात आयआयटी मुंबईने प्रमुख भूमिका बजावावी असे आवाहन त्यांनी केले. “मला ठाम विश्वास आहे की देशात फक्त काही मोजक्या प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत ज्यांच्याकडे 21 व्या शतकातील समस्यांवरची उत्तरे आहेत आणि आयआयटी मुंबई ही त्यापैकी एक आहे असे ते म्हणाले. भारताकडे ज्ञानाची कमतरता नाही आणि भारताने वेळोवेळी हे दाखवून दिले आहे की जगातील जटिल समस्यांवर भारताकडे उपाय आहे असे त्यांनी नमूद केले. आयआयटीने पुढील 50 वर्षांसाठी आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वतता या क्षेत्रांसह भारताच्या गरजा जाणून घ्याव्यात आणि त्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने काम करावे अशी सूचना त्यांनी केली.
आयआयटी मुंबईने यापुढील दशकांमध्ये देशाच्या वाटचालीला आकार देण्यात निर्णायक भूमिका बजावावी असे आवाहन त्यांनी केले. “जेव्हा आपण 5-10 वर्षांनंतर मागे वळून पाहू, तेव्हा आपण आत्मविश्वासाने सांगू शकू की आयआयटी मुंबईने 21 व्या शतकाला अनुरूप कामगिरी केली आणि इतिहासाला आकार देण्यात योगदान दिले आहे.”
आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शुभाशीष चौधरी यांनी प्रधान यांना संस्थेबद्द्ल विस्तृत माहिती दिली आणि संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीबाबत अवगत केले.आपल्या भाषणात, प्रा.शुभाशीष चौधरी म्हणाले: “केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे आयआयटी संस्थेची भरभराट झाली आहे आणि आमच्या माजी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या करिअरच्या विविध क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. मला विश्वास आहे की हे अत्याधुनिक वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी परिसरातले वातावरण आणखी सुधारण्यास मदत करेल.”
आयआयटी मुंबईच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. पवन गोयंका यांनी संस्थेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारकडून दिले जात असलेल्या सहकार्याबद्दल आणि मदतीबद्दल सरकारचे आभार मानले.
Related Posts
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
मुंबईतील केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेचा पंधरावा पदवीदान समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - देशातील मत्स्य आणि जलजीवन…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री नारायण…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी…
-
ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - केंद्रीय सूक्ष्म, लघु व…
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ग्रीन हायड्रोजनबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक…
-
चालू शैक्षणिक वर्षांपासून मराठीची सक्ती;अन्यथा कारवाई होणार– शालेय शिक्षण मंत्री
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यावर्षी इयत्ता…
-
कल्याण डोंबिवलीत शिवसैनिक आक्रमक, केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या विरोधात जोरदार निदर्शने
कल्याण/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी…
-
सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री यांचे सकारात्मक आश्वासन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - खेलो इंडिया…
-
माणसाने सुसंस्कृत असेल पाहिजे,थोड शिक्षण कमी असले तरी चालतं- मंत्री छगन भुजबळ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - मंत्री छगन भुजबळ…
-
आता आयआयटी मुंबईमध्ये मास्टर ऑफ आर्टस् बाय रिसर्च हा नवीन अभ्यासक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आयआयटी म्हणजेच, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ…
-
महाराष्ट्राचा पहिला दिव्यांग पार्क नागपूरात होणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नेशन न्युज मराठी टिम. नागपूर/प्रतिनिधी- महाराष्ट्राचा पहिला दिव्यांग पार्क नागपूरात…
-
नरेंद्र मोदींनी भारत कधीच जोडलाय तुम्ही आधी तुमची पार्टी जोडा - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी -महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी नंतर…
-
ड्रोनवरील अनुभूती केंद्र' या प्रकल्पाचा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते प्रारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली - नवोन्मेषाला चालना आणि…
-
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी खेलो इंडियाच्या ‘डॅशबोर्ड’चे केले अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा व्यवहार…
-
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘कस्तूरी कॉटन भारत’ संकेतस्थळाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य…
-
राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे अफगाणी विद्यार्थ्यांना आश्वासन
पुणे/प्रतिनिधी - अफगाणिस्तान देशातील जे विद्यार्थी महाराष्टात शिकायला आहेत त्यांच्या संकटाच्या…
-
केडीएमसीचे खराब रस्ते,अस्वच्छता पाहून केंद्रीय मंत्री नाराज,अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोबिवली महानगर पालिकेत…
-
ऑस्कर पुरस्कारप्राप्त एलिफंट व्हिस्परर्सच्या टीमची केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय माहिती आणि…
-
कॉप २७ परिषदेच्या समारोप सत्रात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी मांडली भारताची भूमिका
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यूएनएफसीसीसीच्या कॉन्फरन्स ऑफ…
-
पुणे महानगराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे/प्रतिनिधी - पुणे महानगरातील विमानतळ, मेट्रो प्रकल्प तसेच नदी विकास प्रकल्पाला गती…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते समुदाय रेडिओ पुरस्कारांचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय माहिती आणि…
-
बातम्यांच्या प्रसारणात वेगापेक्षा अचूकता महत्त्वाची - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - "विश्वसनीय बातमी सादर…
-
केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षण परीषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स…
-
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या पोर्टलचा प्रांरभ
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय क्रीडा दिन…
-
औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगतीमार्ग बांधण्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद- औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…
-
अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार
प्रतिनिधी.मुंबई - सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून…
-
कल्याणातील मराठी शाळेच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद, मोबाईलविना शिक्षण थाबलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले सुरु
कल्याण/प्रतिनिधी -आजच्या इंग्रजीच्या रेट्यातही मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या निवडक…
-
केडीएमसीच्या शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण…
-
केडीएमसी शिक्षण विभागाच्यावतीने दिव्यांग बालकांना साहित्य वाटप
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका…
-
छत्रपती शिक्षण मंडळाच्या विरोधात आरपीआयच्या वतीने ठिय्या आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व समविचारी पक्ष…
-
केडीएमसीच्या शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्या- वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - आजचे विद्यार्थी हे देशाचे…
-
पाल्यांच्या आरोग्याची लेखी हमी शाळेने देण्याची शिक्षण स्वाभिमानी संघटनेची मागणी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने १…
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
राज्यातील वाळू, रेती उत्खननाबाबत नवीन धोरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नदी व खाडी…
-
तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या शिफारशींनुसार केंद्र…
-
पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’,शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन…
-
नरीमन भवनमध्ये पर्यटन संचालनालयाचे नवीन कार्यालय सुरु
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या स्वतंत्र नवीन कार्यालयाचे उद्घाटन…
-
शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असतानासुद्धा अनेक शाळांनी फी…
-
ट्रॉम्बे युनिट मध्ये खतांच्या नवीन श्रेणींचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्रीय रसायने आणि खते…
-
वस्त्रोद्योगासाठी पीएलआय योजनेंतर्गत नवीन अर्ज स्वीकारण्यास केंद्राची मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - उद्योग हितधारकांच्या…
-
मुंबईत देशातील विविध प्राणिसंग्रहालयातील शिक्षण अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई…
-
बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील बारावीच्या 15…
-
सरकार गरिबांना दर्जेदार शिक्षण देण्यास असमर्थ - अबू आसिम आझमी
भिवंडी प्रतिनिधी - सरकारी शाळांमध्ये गरिबांना योग्य व दर्जेदार शिक्षण…
-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आता नवीन लोगो
मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (एमटीडीसी) नवीन…
-
संत निरंकारी मंडळाचे प्रधान गोबिन्दसिंह यांचे निधन
जालंदर / प्रतिनिधी - संत निरंकारी मंडळाचे प्रधान तसेच मिशनचे…