नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टलचे (मरीन) उद्घाटन केले.राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल (मरीन) (NLP) हा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प असून बंदरे जहाज वाहतूक जलमार्ग मंत्रालय तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या कल्पनेनुसार याची निर्मिती केली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लॉजिस्टिक समुदायातील सर्व भागधारकांना जोडणे, खर्च आणि वेळेचा विलंब कमी करून कार्यक्षमता आणि पारदर्शकता सुधारणे तसेच सेवांच्या सुलभ, जलद आणि अधिक स्पर्धात्मक प्रस्ताव साध्य करणे यासह लॉजिस्टिक क्षेत्रातील सेवांच्या वाढीला चालना देणे आणि त्याद्वारे व्यापार सुधारणे यासाठीचे हे एक – थांबा व्यासपीठ आहे. संपूर्ण देशात पसरलेल्या लॉजिस्टिक क्षेत्राच्या सर्व व्यापार प्रक्रियेसाठी राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल (NLP) हे एकच व्यासपीठ असेल ज्यामध्ये जलमार्ग, रस्ते आणि हवाई मार्गांवरील वाहतुकीच्या सर्व पद्धतींचा समावेश होतो आणि ई-बाजारपेठेसह एक निर्बाध एंड-टू-एंड लॉजिस्टिक सेवा व्याप्ती प्रदान करेल.
राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल (NLP) ही एक थांबा बाजारपेठ आहे जेथे सर्व लॉजिस्टिक भागधारक सुलभ, वेगवान आणि स्पर्धात्मक सेवांसाठी एकत्रित केले जातात आणि ज्यामुळे व्यापार वाढीला चालना मिळते.
राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टलच्या अंमलबजावणीचा पहिला टप्पा राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल मरीनच्या विकासाच्या रुपाने जुलै 2021 मध्ये सुरू करण्यात आला होता. हे एक “खुले व्यासपीठ” आहे जे एकापेक्षा जास्त सेवा प्रदात्यांच्या सहअस्तित्वाला स्वतंत्रपणे किंवा विविध संपर्क पर्याय एकत्र करून EXIM- संबंधित सेवा प्रदान करण्यास अनुमती देते. यामध्ये विविध पोर्ट ऑपरेटिंग सिस्टीम/ टर्मिनल ऑपरेटिंग सिस्टीम, ICEGATE, इतर नियामक संस्था आणि प्रणालीमधील भागधारकांना एकत्रित करण्याची क्षमता आहे. नियामक गुंतागुंत कमी करणे आणि वापरकर्ता-अनुकूल विना कागदपत्र व्यापाराकडे वाटचाल करून व्यवसाय सुलभीकरण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. एक खिडकी प्रणाली विकसित करण्यासाठी सर्व आवश्यक दस्तऐवज, अनुपालन प्रमाणपत्रे आणि EXIM व्यापारासाठी आवश्यक औपचारिक प्रक्रिया केंद्रीकृत करून तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या कौशल्याचा वापर करून हे साध्य केले जाईल.
“पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनची घोषणा केली ज्यामुळे विविध आर्थिक क्षेत्रामध्ये लोक, वस्तू आणि सेवा यांच्या निर्बाध वाहतुकीसाठी पद्धतशीर, मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी प्रदान केली जात आहे. परिणामी, लॉजिस्टिक सेवा आणि आर्थिक क्रियाकलाप पूर्ण कार्यक्षमतेने सुरू असल्याचे मेळाव्याला संबोधित करताना सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. या मिशनची पूर्तता करण्यासाठी बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल (मरीन) हे एक “खुले व्यासपीठ” विकसित केले आहे. हे व्यासपीठ एकापेक्षा जास्त सेवा प्रदात्यांच्या सहअस्तित्वाला स्वतंत्रपणे किंवा विविध संपर्क पर्याय एकत्र करून EXIM-संबंधित सेवा प्रदान करण्यास अनुमती देते.