नाशिक/प्रतिनिधी – नाशिक जिल्ह्याने राज्याला तसेच देशाला उत्तम खेळाडू दिले आहे., त्यामुळे नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी अधोरेखित केले आहे, याचा नाशिककरांना सार्थ अभिमान आहे. अलिकडे नाशिकला मैदानी खेळांची राजधानी म्हणून मिळणारी ओळख कौतुकास्पद असून हे केवळ खेळाडूंमुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
आज विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हास्तरीय खेलो इंडीया ॲथलेटिक्स केंद्राचे उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी क्रीडा उपसंचालक, सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, आंतराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक विजयेंद्र सिंग, शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कारर्थी नरेंद्र छाजेड, तालुका क्रीडा अधिकारी गीता साखरे, क्रीडा अधिकारी महेश पाटील, संदीप ढाकणे, क्रीडा मार्गदर्शक सुरेश काकड, चंद्रकला उदार व विद्यार्थी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील बापु नाडकर्णी (क्रीकेट), कविता राऊत (एथलेटिक्स), दत्तु भोकनळ (रोईंग), किसन तडवी (एथलेटिक्स), मिताली गायकवाड(पॅरास्पोर्टस-धनुर्विद्या), माया सोनवणे (क्रिकेट), विदित गुजराथी (बुद्धीबळ), संजीवनी जाधव, मोनिका आथरे, यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आता एथलेटिक्स खेळात प्रसाद अहिरे, ताई बामणे, दुर्गा देवरे, पुनम सोनवणे आदि खेळाडुंनी नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी अधोरेखित केलेले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, केंद्रीय क्रीडा मंत्रालय यांनी खेलो इंडीया सेंटर अंतर्गत राज्यातील जिल्हानिहाय एक अशा विविध खेळांची एकूण 36 क्रीडा केंद्रे मंजूर केलेली आहेत. यात नाशिक जिल्ह्यातून आपण एथलेटिक्स, ज्युदो, तलवारबाजी, खो-खो, मल्लखांब व धनुर्विद्या असे एकूण सहा केंद्राचे प्रस्ताव सादर केले होते, यापैकी एथलेटिक्स या क्रीडा प्रकारला 21 मे 2021 रोजी मान्यता प्राप्त झाली आहे. त्यादृष्टीने आज या एथलेटिक्स सेंटरची अधिकृतरित्या सुरवात करण्यात झाली असून, उर्वरित पाच क्रीडा प्रकारांच्या सेंटर्सला देखील लवकरच मान्यता मिळून जिल्ह्यात ते सेंटर्स लवकरच सुरू होतील. जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात आली असून खेळाडू व प्रशिक्षक यांची खेलो इंडीयाच्या संकेत स्थळावर नोंदणी करण्यात आली आहे. या सेंटरकरीता केंद्र शासनाकडून प्रथम वर्ष 10 लाख रूपये व पुढील तीन प्रती वर्ष पाच लाख रूपये असा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उपस्थित ॲथलेटिक्स खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले, खेळाडूंनी शक्ती व युक्ती यांचा योग्य समन्वय साधून कौशल्ये आत्मसात करावित. क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक यांच्या योगदानातून निश्चितच आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी उत्तम खेळाडू तयार होतील असा विश्वास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
Related Posts
-
नाशिक येथे खाजगी बस अपघाताच्या घटनास्थळी मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिक येथे आज पहाटे…
-
नाशिक येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालयासह ४३० खाटांच्या रूग्णालयास मान्यता
मुंबई प्रतिनिधी - नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन…
-
नाशिक येथे मुलींसाठी शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत महाराष्ट्रातील…
-
नाशिक येथे एकलव्य आदर्श निवासी शाळेची पायाभरणी
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री…
-
नाशिक-दिल्ली विमानसेवा होणार पूर्ववत, आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाणार नाशिक
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - विमानतळ येथून नाशिक-हैद्राबाद-नाशिक, नाशिक-दिल्ली-नाशिक,…
-
रत्नागिरी येथे कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आज…
-
पुणे येथे होणार साखर संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे…
-
नाशिक पोलिसांकडून प्रथमच महिलेवर तडीपारीची कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी- नाशिक पोलिसांच्या वतीने प्रथमच…
-
मुंबई -नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत…
-
डोंबिवलीत बालभवन येथे गुलाब प्रदर्शनाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. डोंबिवली/प्रतिनिधी- आज पासून डोंबिवलीत भव्य गुलाब…
-
करमाळा येथे दूधाच्या टँकरला अपघात,चालकाचा मृत्यु
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर /प्रतिनिधी - करमाळा तालुक्यात घोटी…
-
सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे…
-
आयएनएस तरकश गॅबनमधील पोर्ट जेंटिल येथे दाखल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाची आयएनएस…
-
शासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना - ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोला/प्रतिनिधी - नाशिक मधील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या चुकीमुळे…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
दिल्ली येथे महाराष्ट्रातील आयसीटीसी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील 191 आयसीटीसी समुपदेशन केंद्र सरकारच्या…
-
पुणे कमांड रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील कमांड रुग्णालयात 30…
-
पुणे येथे सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - एकात्मिक संरक्षण कर्मचारी…
-
विठ्ठलवाडी येथे १०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - आध्यात्मिक जागृतीच्या…
-
उदगीर येथे राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर / प्रतिनिधी - शालेय जीवनापासूनच…
-
नाशिक मनपाच्या कचरा डेपो बाहेर ठाकरे गटाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - नाशिक शहरालगत…
-
नाशिक मध्ये पोलीस निरीक्षकाची पोलिस ठाण्यात आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - पोलीस निरीक्षक दर्जाच्या…
-
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नाशिक मध्ये राजकीय सभांचा धडाका
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - २०२४ ची ही…
-
नेवासा येथे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचितचा पाठींबा
अहमदनगर/प्रतिनिधी - नेवासा-गेल्या आठ दिवसांपासून राज्यभरात एस .टी .कर्मचाऱ्यांचा संप…
-
इंधन दरवाढी विरोधात खारबाव येथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको
भिवंडी/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासनाकडून दररोज इंधन दरवाढ सुरू…
-
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पीक कर्जाबाबत आढावा बैठक
नाशिक/प्रतिनिधी- कोरोना महामारीचा विचार करता शेतकऱ्यांना शेती कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ…
-
नागपूर येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे सन २०२२ चे…
-
रांजनगाव येथे इएसआयसी कडून जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कामगार राज्य विमा महामंडळ…
-
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त सोलापूर येथे पुस्तकांचे वाटप
सोलापूर - संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले असल्याने त्यांना…
-
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद, शेतकऱ्यांना बसतोय फटका
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. https://youtu.be/mSO6ZmtLS2g?si=vpwnIEkbhWFX354u नाशिक/प्रतिनिधी - नाशिक मध्ये…
-
नाशिक मध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून युवकाची भरदिवसा हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - नशिक मध्ये…
-
नाशिक मध्ये गल्हाटी धरण संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - अंबड तालुक्यातील…
-
कुर्ला बीकेसी येथे पोलिस शिपाई सर्पमित्राने दिले अजगराला जीवदान
मुंबई प्रतिनिधी- कुर्ला बीकेसी येथील सेबी भवन येथे साप असल्याचे…
-
गोवा येथे होणार भारतातील पहिला दीपगृह महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - गोव्याची…
-
नाशिक मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - येत्या २२ जानेवारी…
-
बार्टी मार्फत दिक्षाभूमी येथे ८५ टक्के सवलतीत पुस्तक विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - 67 वा धमचक्र प्रवर्तन…
-
क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते राजस्थानमध्ये खेलो इंडिया केंद्रांचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - जयपूर…
-
शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा येथे सापडली ७१६ पुरातन नाणी
प्रतिनिधी . कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्यातील मौजे अणुस्कुरा येथे जेसीबीच्या…
-
आमदार रोहित पवार यांचा अमळनेर येथे संदेश मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या…
-
ठाणे येथे बॅडमिंटन खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या…
-
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे भरते पोपटांची शाळा
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - म्हणतात ना…
-
ऑक्सिजन एक्सप्रेस’द्वारे नाशिक जिल्ह्यासाठी २७.८२६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त
नाशिक/ प्रतिनिधी - जिल्ह्यातील ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी विशाखापट्टणम् येथून…
-
चांदवड मुंबई आग्रा मार्गावरील चौफुली येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - कांदा निर्यात…
-
मोहोळ येथे होणार लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर
सोलापूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी रुग्णाना योग्य उपचार मिळावे.त्यांच्या…
-
महिला आयोगाच्या मुख्यालयातील कायदेविषयक सल्ला केंद्राचे उद्या लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील…