Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
आरोग्य थोडक्यात

सुनील गावसकर यांच्या हस्ते लहान मुलांवरील शस्त्रक्रिया ऑपरेटिंग रूमचे उद्घाटन

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – मास्टर ब्लास्टर माजी कर्णधार सुनिल गावसकर यांचे क्रिकेट जगतात फार मोठे नाव आहेच. पण गावसकरांची एक वेगळी बाजू सुद्धा आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे. बालकांच्या हृदयावर पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या खारघर येथील सत्यसाई संजीवनी इंटरनॅशनल सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर रुग्णालयासोबत सुनिल गावस्कर अनेक वर्षांपासून जोडले गेले आहेत.

नवी मुंबईतील खारघरमध्ये सत्यसाई चॅरिटेबल ट्रस्टचे लहान मुलांवरील शस्त्रक्रिया ऑपरेटिंग रूमचे उद्घाटन प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी सुनील गावसकर यांनी उपक्रमाचे कौतुक केले तसेच सत्यसाई चॅरिटेबल ट्रस्टचे अनेक ठिकाणी रुग्णालय असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले. तर आपल्या जीवनात या सत्यसाई चॅरिटेबल ट्रस्टचे बहुमोल योगदान असल्याचे देखील गावसकर यांनी यावेळी सांगितले आहे. आपल्या जीवनात आपण पाहिली सुरुवात क्रिकेट पासून सुरू केली तर दुसरी इनिंग आपण काम आणि व्यवसायात सुरू केली आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची सुरुवात सत्यसाई चॅरिटेबल रुग्णालयात आपला सहभाग देऊन केल्याचे सांगत ट्रस्टचे योगदान आणि सामाजिक कार्य पाहता याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढेल अशी आशा देखील क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केली आहे.

Translate »
X