नेशन न्यूज मराठी टीम.
पुणे/प्रतिनिधी – पुण्यातील कमांड रुग्णालयात 30 ऑगस्ट 2022 रोजी लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस नैन, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेवा पदकप्राप्त, एडीसी, यांच्या हस्ते 120 खाटांच्या दुर्धर रोगांवरील उपचार केंद्राचे (MDTC) उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र कमांड रुग्णालय संकुलाचा एक भाग आहे आणि डॉक्टर आणि निमवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समर्पित आणि अनुभवी चमूद्वारे कर्करोगाच्या रूग्णांना सर्वसमावेशक दर्जेदार सेवा देण्यासाठी समर्पित ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग आणि डे केअर सुविधेसह अत्याधुनिक सुविधांनी पूर्णपणे सुसज्ज आहे.
केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि रेडिएशनसह कर्करोगाच्या रुग्णांचे निदान, वर्कअप आणि उपचार एकाच ठिकाणी मिळणारे हे केंद्र आहे आणि त्यात दोन खाटांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट देखील समाविष्ट आहे. या नवीन सुविधेसह, कर्करोगाची काळजी आणि संशोधन नवीन उंची गाठेल आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या रुग्णांना अडचणीत मदत करेल.