नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण /प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते रिजन्सी अनंतम येथील बायोगॅस प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.बायोगॅस वर शाळेत असताना आपण सर्वांनी अभ्यास केला होता. पण ही गोष्ट फार कमी वेळा अमलात आणली जाते. सरकारच्या वतीने किंवा महानगरपालिकेच्या वतीने अशा पद्धतीचे प्रकल्प बऱ्याच ठिकाणी उभे केले जातात. पण खाजगी गृह संकुलामध्ये फार कमी वेळा बायोगॅस प्रकल्प उभारला जातो. पण डोंबिवली मध्ये पहिल्यांदाच एका खाजगी गृह संकुल रिजन्सी अनंतम मध्ये बायोगॅस प्रकल्प उभारला गेला आहे. ज्यामुळे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेवर पडणारा कचऱ्याचा भार थोड्याफार प्रमाणात कमी होईल. ओल्या कचऱ्याचे विघटन जागेवर करता येणं शक्य असल्यामुळे त्या गॅस मधून मिळणाऱ्या विजेमुळे त्या प्रकल्पाची मशीन तर कार्यरत राहीलच पण त्यासोबतच परिसरातील स्ट्रीट लाईट वर येणारा विजेचा खर्च देखील कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भाऊसाहेब दांगडे उपस्थित होते. त्यांच्याहस्ते बायोगॅस प्रकल्पाची मशीन ऑन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी महेश अग्रवाल, अनिल भटिजा, उद्धव रूपचंदानी, विकी रूपचंदानी, संतोष डावखर तसेच रिजन्सी अनंतम मधील रहिवाशी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. बायोगॅस प्रकल्प उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले.
पाणी वाचवा या विषयावर एक छोटेसे स्किट देखील रिजन्सी अनंतम मधील रहिवाशांनी सादर केले. सर्वांनी मिळून पाणी वाचवण्यासाठी आणि कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी जाहीर रित्या शप्पथ देखील घेतली. यावेळी बायोगॅस प्रकल्प या विषयावर चित्रकला व पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये रिजन्सी अनंतम मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एकूण दहा हजार रुपये ची रोख बक्षिसे आणि ट्रॉफी देण्यात आली. ज्यामध्ये आपली कला रेखाटून वेदांत राणे व रुद्रा पराडकर यांनी प्रथम, अथर्व वाणी व मनुष् कलवारी यांनी द्वितीय, प्रणव येवले व तनिष्का निर्गुण यांनी तृतीय पारितोषिकावर नाव कोरले.
Related Posts
-
ऊर्जा विभागाचा लिक्विड नॅचरल गॅस निर्मितीसंदर्भात किंग्स गॅस कंपनीसोबत सामंजस्य करार
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - लिक्विड नॅचरल गॅस निर्मिती…
-
सावळाराम महाराज क्रीडा संकुलात वृक्षारोपण
डोंबिवली/प्रतिनिधी - हभप सावळाराम महाराज क्रीडा संकुलात येणाऱ्या नागरिकांना आणि दुपारच्या…
-
कल्याणात गॅस गळतीमुळे घरगुती सिलेंडरचा भीषण स्फोट
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्सजवळील कोळीवली गावात काल रात्री…
-
एचपी गॅस एजन्सीकडून घरगुती गॅसची चोरी, पोलिसात तक्रार दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया/प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यात गेल्या अनेक…
-
गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घेण्यासाठी वंचितचे घंटानाद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. भुसावळ/प्रतिनिधी - केंद्र सरकारने घरगुती गॅसची…
-
लळींग घाटात गॅस टँकरला ट्रॉलाची धडक, चालक गंभीर
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी -मुंबई - आग्रा महामार्गावरील लळींग…
-
घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - आतापर्यंत तुम्ही चोरी,लूटमार…
-
डोंबिवलीत गॅस शवदाहिनीच्या भडक्यात कर्मचारी जखमी, उपचारासाठी कर्मचार्याची होरपळ
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली पूर्वेत असणाऱ्या पाथर्ली स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीचा…
-
छठपूजा उत्सवानिमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी…
-
मोदींच्या उज्वला गॅस योजनेच्या बॅनरखालीच राष्ट्रवादीचे इंधन दर वाढी विरोधात आंदोलन
भिवंडी प्रतिनिधी केंद्र शासनाने घरगुती गॅस सह पेट्रोल , डिझेलच्या…
-
नवी मुंबई परिवहनच्या सीएनजी बसमधून गॅस गळती, नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिका परिवहनच्या…
-
मुंबई आयआयटीच्या संकुलात तंत्रज्ञान नवोन्मेश विषयावर चौथ्या कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई आयआयटीमध्ये शिक्षण…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते सातारा येथील महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे उद्धाटन
सातारा/प्रतिनिधी - महिलांनो तुम्ही कमकुवत नाही आत्मनिर्भर व्हा, तुमच्याकडे कोणी…
-
गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात वंचितचे आंदोलन, चुलीवर भाकरी थापवुन सरकारचा निषेध
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - अगोदरच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे…
-
नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या…
-
महाराष्ट्राला ५१ ‘पोलीस पदक’, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घोषणा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली -पोलीस पदकांची आज घोषणा झाली,…
-
सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई/प्रतिनिधी - गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना…
-
कल्पना सरोज ग्लोबल एव्हीऐशन प्रकल्पाचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते भूमीपूजन
नागूपर/प्रतिनिधी - टेलरींग काम ते कोट्यवधीच्या उद्योगाचे यशस्वी वहन करणाऱ्या डॉ.…
-
गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी १ हजार २९ कोटींची तरतूद -उपमुख्यमंत्री अजित पवार
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक - गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची…