नेशन न्यूज मराठी टीम.
रत्नागिरी / प्रतिनिधी – कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना वाद्यालयात कारागिरांची लगबग सुरू झाल्याचे दिसून येत आहे. कोकणामधील सर्व तालुक्यातील व अन्य ठिकाणच्या तसेच बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
गणेशोत्सवात आरती, लगबग. भजन, नाच, जाखडी, टिपरी नृत्य आदी कलाप्रकार उत्साहात साजरे केले जातात. यासाठी विविध वाद्यांची आवश्यकता असते. त्यामध्ये ढोलकी, नाल, पखवाज, झांज, पेटी, ताशा, ढोल यांसारख्या विविध वाद्यांची गरज असते. त्यामुळे सध्या वाद्यनिर्मितीच्या आणि दुरुस्तीच्या कामांनाही वेग आल्याचे दिसून येत आहे.पारंपरिक वाद्य दुरुस्ती करण्यासाठी सध्या ग्राहकांची वाद्यालयामध्ये रीघ चालू आहे. सध्या बाजारपेठेत लोक वाद्य दुरुस्ती करण्यासाठी अथवा खरेदीसाठी येत आहेत. वाढत्या महागाईच्या काळातही गणेशभक्तांना माफक दरामध्ये सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो असे व्यापाऱ्यांमधून सांगितले जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात नाचगाण्याला रंग भरू लागतात. टिपरीचे ताल धरू लागतात आणि वाद्याच्या ठेक्यावर गणेशोत्सवाच्या आगमनाची घराघरांतून चाहूल लागल्याचे दिसून येते. हा उत्सव अधिक आनंददायी होण्यासाठी वाद्यांची आवश्यकता असते सध्या वाद्यालयात वाद्य दुरुस्तीसाठी आणि खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच फिरत्या विक्रेत्यांमुळे पारंपारिक वाद्य दुरुस्ती करणाऱ्या व्यवसायावर परिणाम होत आहे. असे व्यापाऱ्यांमधून सांगितले जात आहे.