नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – एका महिलेचा तिच्याच घरात गळा दाबून खून केल्यानंतर तिचा मृतदेह घरातील बेड मध्ये लपवून आरोपी फरार झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवली येथील दावडी गावातील ओम रेसिडेन्सी येथे घडली आहे. यासंदर्भात या महिलेच्या पतीने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सुप्रिया शिंदे ( ३३) असे मृत महिलेचे नाव असून पती किशोर कामाला गेला होता. संध्याकाळी किशोर घरी आल्यानंतर सुप्रियाला शोधाशोध करण्यास सुरुवात झाली. मात्र कुठेच पत्ता लागत नसल्याने शेवटी पोलीस ठण्यात तक्रार करायची असे ठरवून किशोर पोलीस ठाण्यात गेले. मात्र घरात जमलेल्या नातेवाईकांच्या सुप्रिया मृत अवस्थेत सोफा बेड मध्ये असल्याचे दिसून आले. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसात तक्रार करण्यासाठी गेलेल्या किशोरला फोन करून सांगितल्यानंतर पोलीस आणि पती किशोर घटनास्थळी दाखल झाले.अधिक तपास मानपाडा पोलीस करत आहेत.