नेशन न्यूज मराठी टिम.
नाशिक/प्रतिनिधी– लासलगाव येथील कृषी बाजार समितीत कांद्याच्या झालेल्या लिलावात कांद्याच्या सरासरी बाजार भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक घटल्याने आज पाचशे रुपयांची मोठी वाढ दिसून आली आहे. तेराशे वाहनातून बारा हजार क्विंटल कांद्याची आवक आली होती. त्याला जास्तीत जास्त 2301 रुपये, कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 2100 रुपये इतका क्विंटलला बाजार भाव मिळाले आहे.
बदलत्या वातावरणामुळे चाळीमध्ये साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्याने सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर दुप्पट होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जरी जात असेल मात्र केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहून कांद्यावर निर्बंध अथवा विदेशातून कांदा आयातीचा निर्णय घेऊ नये अशी विनंती केली आहे.