नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – शेत नांगरणीचे पैसे मागितल्याच्या रागातून आरोपीने संबंधित तरुणाला लोखंडी हत्याराने मारहाण करून, त्याला जीवे ठार मारून घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या शिताफीने मूसक्या आवळल्या आहेत.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बेहेड विटाई येथे शेत नांगरणीचे पैसे मागण्याच्या कारणावरून वाद झाला होता.
वादा नंतर आरोपीने लोखंडी पहार उचलून खांद्यावर, हातावर व पायावर मारून संबंधित तरुणास गंभीर जखमी केले, व या गंभीर जखमी असलेल्या तरुणास शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला व त्यानंतर संबंधित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता, परंतु साक्री पोलिसांनी शिताफीने तपास करत या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत, त्याचबरोबर साक्री पोलीस ठाण्यामध्ये या आरोपी विरोधामध्ये विविध कलमान्वये त्याचबरोबर खुनाचा देखील गंभीर गुन्हा दाखल केला आहे.