नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – धुळे महानगर पालिका हद्दीत मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासांतर्गत तब्बल ३१ कोटी ७३ लाख रुपयांवर खर्चाच्या कामांना महापालिकेच्या स्थायी समिती सभेने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली होती. यात विविध प्रभागातील ३९ कामांचा समावेश होता, याशिवाय सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविणे, रस्ते व क्रॉस ड्रेनेजची दुरुस्ती व आनुषंगिक कामांच्या विषयालाही स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली होती, मात्र ह्या मंजुरी फक्त कागदावरच असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.
गणेशोत्सव, ईद, नवरात्रोत्सव आदी विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यास देखील स्थायी समितीने मंजुरी दिली, मात्र मनपा ने घेतलेले विषयी अद्याप पर्यंत मार्गी लागलेले नसल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे गणेश उत्सव तोंडावर आला असता ज्या मार्गावरून गणेश उत्सवाच्या मिरवणुका निघणार आहे त्याच मुख्य मार्गावर भले मोठाले खड्डे पडल्याचे चित्र सध्या शहरात बघायला मिळत आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्तांची भेट घेऊन धुळे शहरातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच ऐंन सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील एकही खड्डा अजून पर्यंत पोहोचवला गेला नसल्याची जाणीव महापालिकेला करून दिली मात्र महापालिकेने पावसाचा प्रश्न पुढे करत वेळ मारून घेण्याची यावेळेस बघायला मिळाले. शिवसेना ठाकरे धुळे मनपाला इशारा दिला आहे की लवकरात लवकर धुळे शहरातील खड्डे बुजवला अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे येणाऱ्या काळात धुळे शहरातील खड्ड्यांचा प्रश्न कधी मार्गी लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.