नेशन न्यूज़ मराठी टिम.
मुंबई/प्रतिनिधी – मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ “द न्यू फिश जेट्टी सी फुड डिलर असोशिएशन व भाऊचा धक्का सी फूड सप्लायर्स असोशिएशन व भाऊचा धक्का मच्छिमार कामगार संघटना” यांनी एक दिवसीय बंद पुकारला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहण्यासाठी “मराठा क्रांती मोर्चा मुंबईचे समन्वयक भाऊचा धक्का येथे उपस्थित राहणार आहेत. लवकरात लवकर जरांगेंच्या मागणीची दखल घ्यावी, असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाचे म्हणणे आहे.