नेशन न्यूज मराठी टीम.
नंदुरबार/प्रतिनिधी – नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने मोठ्या प्रमाणावर अवैद्यरीत्या दारू गुजरात राज्यात पाठवली जाते. मात्र संबंधित दारूबंदी विभागाकडून कुठलीही कारवाई करतांना दिसत नसून सुस्त आहे तर दुसरीकडे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जानेवारी ते जून महिन्यापर्यंत ७७१ गुन्हे दाखल करून अवैध दारू वर कारवाही केली आहे. आता पर्यंत करण्यात आलेल्या कारवाहीत 771 गुन्ह्यांमध्ये 2 कोटी 25 लाखापेक्षा अधिकची वसुली पोलीस दलाने केलेली आहे. तर 771 केसेस मध्ये 791 आरोपींना शिक्षा देखील देण्यात आलेली आहे.
मात्र राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आलेल्या नसल्याचे दिसून येत आहे. गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने मध्य प्रदेशची दारू नंदुरबार जिल्ह्यातील छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर गुजरात राज्यात पाठवली जात असते. त्यामुळे राज्य उत्पादन विभागाकडून कारवाई करणे गरजेचे असताना मात्र तसं कुठही होताना दिसून येत नाही. तर दुसरीकडे पोलीस दलाकडून मोठ्या प्रमाणावर दारूबंदीच्या कारवाया करण्यात येत असल्याने पोलीस विभागाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.