नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
सांगली/प्रतिनिधी – सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला क्विंटलला ४१ हजार १०१ रूपयांचा दर सौद्यामध्ये मिळाला आहे. सांगलीतील हळद बाजाराच्या इतिहासात हा सर्वोच्च दर मिळाला आहे. सध्या नवीन हंगामातील हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून प्रामुख्याने राजापुरी हळदीची आवक आहे. विजयकुमार आमगोंडा पाटील मजलेकर यांच्या अडत दुकानामध्ये काढण्यात आलेल्या हळद सौद्यामध्ये कर्नाटकातील सायबान भूपती पुजारी या शेतकर्यांच्या हळदीला ४१ हजार १०१ रूपये प्रति क्विंटलने मागणी झाली.
श्रीकृष्ण कार्पोरेशनने ही हळद उच्चांकी दराने खरेदी केली. सांगली बाजारात विक्रीसाठी १२ हजार ९०० क्विंटल हळदीची आवक झाली असून आतापर्यंत ९ लाख ७११४ क्विंटल आवक झाली आहे. सौद्यामध्ये हळदीला किमान १२ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून प्रतवारीनुसार सरासरी दर २७ हजार रूपये आहे. यंदा हळदीला दर चांगला मिळत असून उच्चाकी दराचा फायदा हळद उत्पादक शेतकर्यांना होत आहे.