महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी यशोगाथा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या तत्पर मदतकार्याची शासनामार्फत दखल, सन्मानपत्र देवून विशेष सन्मान

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई / प्रतिनिधी - इर्शाळवाडी येथील भूस्खलन दुर्घटनेत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेची अग्निशमन, आरोग्य, स्वच्छता व आपत्ती निवारण पथके मदतकार्यासाठी मध्यरात्रीच घटनास्थळी रवाना झाली. या तत्पर मदतकार्य करणाऱ्या पथकांना प्रातिनिधिक स्वरूपात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते, महापालिका मुख्यालयातील विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले.

सदर सन्मानापूर्वी दुर्घटनास्थळी दुर्गम भागात मदतकार्य करण्यासाठी जात असताना आकस्मिक निधन झालेले नमुंमपा अग्निशमन विभागाचे सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच आपत्ती प्रसंगात धाडसाने मदतकार्य करणारे अग्निशमन अधिकारी श्री. पुरुषोत्तम जाधव व अग्निशमन विभागाचे सहकारी पथक, आपत्ती मदतकार्य व घनकचरा व्यवस्थापन समुहाचे प्रमुख प्रतिनिधी सहा. आयुक्त श्री. शशिकांत तांडेल आणि सहकारी पथक तसेच डॉ. सोनल बन्सल व समूह यांचे आरोग्य पथक या पथकांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात आला.

सतत 4 दिवस चाललेल्या या मदतकार्यात एनडीआरएफच्या जवानांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांनीही दररोज सक्रिय सहभाग घेतला तसेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणा-या सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ते साहित्य आपत्तीग्रस्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.नवी मुंबईतीलच नव्हे तर इतर गाव - शहरातील आपत्ती प्रसंगात नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी नेहमीच मदतकार्य करण्यात पुढाकार घेतलेला आहे. ही परंपरा कायम राखत इर्शाळवाडी दुर्घटनेतही नवी मुंबई महानगरपालिका पथकांनी चांगली कामगिरी केली. याचा अभिमान वाटत असल्याचे नमूद करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी या पथकांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान केला. पथकात सहभागी सर्वच अधिकारी, कर्मचारी यांस लवकरच प्रशस्तीपत्रे प्रदान करुन त्यांचा कामगिरीचा गौरव करण्यात येईल असेही आयुक्तांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या तत्पर मदतकार्य सेवेबद्दल रायगड जिल्ह्यामार्फत खालापूरचे तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्यामार्फत विशेष सन्मानपत्र स्वातंत्र्यदिनाच्याच दिवशी अभिनंदनपूर्वक प्रदान करण्यात आले. मौजे इर्शाळवाडी, ता. खालापूर येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळून निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अत्यंत सचोटीने व तत्परतेने शोध आणि बचावकार्य सुरु करुन नैसर्गिक आघाताने निराश्रीत झालेल्या आदिवासी बांधवांना तात्काळ महत्वपूर्ण मदत करुन दिलासा दिल्याबद्दल हे विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे. केवळ कर्तव्यभावनेने नाही तर भावनिक व सामाजिक जबाबदारीने केलेल्या अहोरात्र मदतीबद्दल शासनामार्फत दखल घेण्यात येऊन विशेष पुरस्कार देत सन्मानपत्र प्रदान करण्यात येत असल्याचे तहसीलदारांनी नमूद केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या तप्तर मदतकार्याची दखल विशेष सन्मानपत्राव्दारे शासनामार्फत घेण्यात आली असून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यदिनी या मदतकार्य पथकांचा विशेष गौरव करण्यात आला. या मदतकार्य पथकातील प्रत्येक अधिकारी व कर्मचा-यास व्यक्तिगत प्रशस्तीपत्रकही दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×