नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी – केंद्र सरकारच्या माध्यमातून हिट अॅन्ड रन कायदा पारित केला आहे. या कायद्यानुसार अपघातास जबाबदार वाहन चालकास सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. याच कायद्याला विरोध म्हणून आजपासून महाराष्ट्रासह देश भारतील सर्वच वाहन चालक आक्रमक झाले आहेत. या कायद्याचा विरोध म्हणून नवी मुंबईतील शेकडो वाहन चालकांनी रस्त्यावर उतरुन रस्ता रोको केले आहे.
उलवे नवी मुंबईतील बेलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, यावेळी या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून,वाहन चालकांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. लाठ्या काठीने पोलिसांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एन आर आय पोलिसांनी चाळीस ते पन्नास ट्रक चालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी माहिती दिली आहे.