Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
मुख्य बातम्या राजकीय

महाराष्ट्रात मोदींची नाही तर ठाकरेंची गॅरंटी चालते-आदित्य ठाकरे

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

https://youtu.be/FuFHDHUCk5Q?si=NgJjY0O1WYMdoIdA

अहमदनगर/प्रतिनिधी – शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात ‘हाय व्हाल्टेज’ सामना होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. वाकचौरेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे हजर होते.

भाजपच्या प्रचारामध्ये ‘मोदी गॅरंटी’ चा उल्लेख नेहमी केला जातो. पंतप्रधान मोदी देखील आपल्या भाषणामध्ये मोदी गॅरंटीचा उल्लेख करून मतदारांना त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण होणारच असे सांगत असतात. भाजपच्या आक्रमक प्रचार रणनीतीला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. सांगली आणि रत्नागिरी विषयी बोलताना ते म्हणाले “महाराष्ट्रात मोदींची नाही तर ठाकरेंची गॅरंटी चालते. मोदी आल्यानंतर गॅस सिलेंडर अकराशे पार गेलाय. नागरीक जागरूक आहेत. देशभरात परिवर्तनाची लाट आहे.” असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Translate »
X