नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात बरेच राजकीय भूकंप झाले. त्याचे मुख्य सूत्रधार भाजप असल्याचं म्हटलं जातं. तसेच भविष्यात महाराष्ट्रातील राजकारण आपल्या बाजूनं पुढं नेण्यासाठी भाजपनं इथल्या अनेक गोष्टींवर नियंत्रण मिळवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
लोकसभा मतदारसंघाभोवती आधीच राजकीय पिंगा सुरू असताना एकीकडे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांची नाराजगी दूर करत कल्याण लोकसभेमध्ये आपला उमेदवार कसा निवडून येईल या प्रयत्नात आहेत तर दुसरीकडे आता आणखी एक नवीन वळण कल्याण लोकसभेला आलेलं पाहायला मिळत आहे. भाजपचे माजी अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष राकेश जैन जे चार महिन्यात आधी प्रदेश उपाध्यक्ष कार्यकाळ संपल्यानंतर कुठल्याच प्रकारचे पद न घेता एक कार्यकर्ता म्हणून सध्या काम करत आहे.
मात्र आता राकेश जैन यांनी महायुतीच्या विरोधात बंड पुकारत कल्याण लोकसभेतून अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे या सीट बाबत भाजप आग्रही आहे का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जैन यांचं म्हणणं आहे की “हा मतदारसंघ पारंपरिकरित्या भाजपाचा आहे. त्याचप्रमाणे त्यांना सर्व समाजाचा पाठींबा असून इथून पुढेही कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार” असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. आता कल्याणच्या जनतेचे प्रेम आणि पाठिंबा नक्की कुनाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.