नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – इगतपुरी तालुका हा पावसाचे माहेर आणि धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणे आहेत. मात्र तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या या मतदार संघात स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्स साजरा झाल्यानंतरही आदिवासी समाजातील नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक पण सत्य चित्र समोर येत आहे. शासनाच्या ‘जलजीवन मिशन अंतर्गत’ योजना असूनही त्याचा फायदा या नागरिकांना होतांना दिसुन येत नाही.
इगतपुरी तालुक्यातील अनेक भागात अजूनही महिलांना आणि मुलींना भर उन्हात पायपीट करत करत पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. धरण झाल्यावर धरणालगत पुनर्वसन झालेल्या अनेक वाड्यापाड्यांना धरणा लगत असून सुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला ही म्हण तंतोतंत येथे लागू पडत आहे. तसेच रस्त्यांच्या अपुऱ्या आणि रखडलेल्या कामामुळे रुग्णांना आणि गरोदर महिलांना आजही झोळीतून नेण्याची वेळ येत असून हाच का आत्मनिर्भर भारत असे म्हणण्याची वेळ या बांधवांवर आली आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे आमच्या आदिवासी बांधवांवर ही वेळ आली आहे. यामुळे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जलजीवन मिशन आणि आणि थाटामाटात उद्घाटन झालेल्या रस्त्यांच्या कामाची तसेच अपूर्ण असलेल्या कामांची तात्काळ चौकशी करून संबंधित असलेल्या अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी स्थानिक ग्रामस्त यांच्या कडून हॉट आहे.