Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

गोंदिया जिल्ह्यात हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.

गोंदिया/प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या हत्तीच्या कळपाने मोठा धुमाकूळ माजवला असून गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धान पिकांच्या बरोबरचं अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हरभरा, तूर, वटाणा, मूग यांसारखे अनेक पीक लावले होते. मात्र, हत्तीचे कळप या ठिकाणातून येत जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. याविषयी शेतकऱ्यांनी वन विभागाला तक्रार करुन अद्यापही वन विभागाने पंचनामे केले नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हत्तीच्या कळपाने नासधूस केली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे, राजोली, भरणोली आणि नवेगाव बांध क्षेत्राच्या जंगल परिसराच्या जवळ असलेल्या शेतामध्ये हत्तीच्या कळपाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. हत्तीच्या कळपाने शेतकऱ्यांनी या भागात लावलेल्या हरभरा, वटाणा, मूग आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असल्याचे दिसून आले आहे. या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी वन विभागाने लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. मात्र, अद्यापही वन विभागाने या परिसरातील हत्तीच्या कळपाने केलेल्या नासाडीची पाहणी सुद्धा केली नसल्याचे दिसून आले आहे.

मागील वर्षी सुद्धा हत्तीच्या कळपाने अर्जुनी मोरगाव क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नासाडी केली होती. याविषयी त्या क्षेत्राचे आमदार मनोहर चंदिकापुरे यांनी पाहणी करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले. परिसरातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशाप्रकारे नुकसान भरपाई मिळेल याकरिता वनमंत्री यांना यासंबंधित माहिती देऊन लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांना कशाप्रकारे मोबदला देण्यात येईल, याविषयी प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी शेतकरी वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X