नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – पूर्वेतील टाटा लाईन परिसरातील रहिवासी आपल्या घरात झोपले होते. रात्री अडीच वाजताच्या सुमारास काही लोक आपल्या घराबाहेर जोरजोरात बोलत असल्याचे नागरिकांना जाणवले. बाहेरील लोकांचा आवाज ऐकून रहिवासी घराबाहेर पडले, नागरिकांनी पाहिले की, समोरच्या व्यक्तीच्या हातात धारदार शस्त्रे आणि लाकडी दांडके आहेत. त्यांच्यासोबत एक बुलडोझर त्यांच्यासोबत होता. या लोकांनी घरात झोपलेल्या राहिवास्यांना जबरस्तीने घराबाहेर काढण्यास सुरुवात केली. बघता-बघता सात कुटुंबियांना घराबाहेर काढून त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवला गेला, त्यामुळे एकच गोंधळ आणि विरोध झाला. या घटनेत सात कुटुंबे बेघर झाली आहेत. या घटनेतील पिडीत कुंटुंबांनी रामनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
स्वतःला महापालिका कर्मचारी सांगून हे कृत्य केले असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश जवादवाड यांनी सांगितले आहे.