नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय खेचून आणत एकहाती सता आणली. या विजयाचा आनंदोत्सव डोंबिवली शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरा केला. पूर्वेकडील इंदिरा चौकात फटाक्यांची आतीषबाजी करून एकमेकांना पेढे भरविले. राहुल गांधी आगे बढो हम आपके साथ है, काँग्रेस झिंदाबाद अशा घोषणा देत इंदिरा चौकातील रिक्षा चालकांसह नागरिकांना पेढे वाटप केले.त्याच बरोबर जातीपातीचे राजकारण करणाऱ्या भाजपला धूळ चारली अशी प्रतिक्रिया या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रदेश प्रतिनिधि एमपीसीसी पॉली जैकब, मानव अधिकार जिल्हा अध्यक्ष राजकुमार हीरावत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विनोद पिल्लई, सचिव प्रमोद त्यागी, डोंबिवली शहर अध्यक्ष अजय पौळकर, आरोग्य सेल जिल्हाअध्यक्ष जितेंद्र मुळे,,संतोष चंद्रपीनी, राजू सोनी, सत्यवान मूलम,श्रेयाश सिंह,निर्मल कुमार,शमशेर खान,दत्ता खरात, संकेत चौधरी,कृष्णा ठाकूर,यादव आदी कार्यकर्त्यानी जल्लोष केला. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होताच एक-एक करीत काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. शहरात असे दृष्य म्हणजे डोंबिवलीकरांना अचंबीत करणारे होते. पूर्वेकडील इंदिरा चौकात एकत्रित झालेल्या कार्यकर्त्यांनी आनंदाने घोषणाबाजी करत फटाके वाजविले.