Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

डोंबिवलीत विद्यार्थ्यांना गांजा पुरवणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/3FggrzkHTgQ

डोंबिवली – धुळ्यातील आदिवासी भागातून विक्री होणारा गांजा खरेदी करून तो पुरवणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या टोळीचा डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीमधील डोंबिवली येथे राहणाऱ्या आनंद शंकर देवकर या आरोपी कडून ३ लाख १० हजार ५०० रुपयाचा माल जप्त केला आहे. विशेष म्हणजे हा इसम कॉलेज मधील विद्यार्थ्यांना गांजा पुरवत होता.
या प्रकरणातील राम नगर रोड येथे राहणाऱ्या आनंद शंकर देवकर, शिरपूर येथे राहणारा रेहमल पावरा, संदीप पावरा , यांना अटक केली असून यातील दिनेश शिवाजी पावरा हा मुख्य आरोपी फरार आहे.

एक इसम अमली पदार्थ घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार हॉटेल शिवमच्या बाजूस हा इसम पदार्थांची विक्री करणार असल्याचेही समजले होते. त्यानुसार सापळा रचल्या नंतर एक इसम मोकळ्या मैदानात दोन गोण्या घेऊन उभा असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेतले असता २० किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. त्यानंतर तपास केल्यावर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आदिवासी भागातून गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यातील मुख्य आरोपी फरार आहे.

अशा पद्धतीने कोणी गांजा विक्री करताना किंवा गांजा पिताना आढळून आले तर त्वरित ९८२३२२४५८४ किंवा ९९२२९९८६९८ या क्रमांकाला संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी केले आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ , सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी मोरे , मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उलगडला असून अधिक तपास ते करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X