नेशन न्यूज मराठी टिम.
नाशिक/प्रतिनिधी – दिंडोरी तालुक्यातील वनी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या व कांदा उत्पादक शेतकरी यांच्या वतीने कळवण फाट्यावरील क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौकामध्ये आज केंद्र सरकारच्या विरोधात रस्ता रोको करण्यात आले. यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, वनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, गणपत बाबा पाटील, वनीचे उपसरपंच विलास कड, कांदा उत्पादक संघटनेचे तालुका अध्यक्ष कळवण विलास नाना रौदळ, संतोष रहेरे, गंगाधर निखाडे आदीं या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळेस केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आले व उद्यापासून मार्केट कमिटी तर्फे कांदा लिलाव बंद राहणार असल्याची घोषणा करण्यात आली.
कांदा निर्यातीवर लावलेल्या चाळीस टक्के निर्यात शुल्काच्या विरोधात स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात वणी ता. दिंडोरी येथे शेतकऱ्यांनी सुरत शिर्डी हायवे रोखला. महागाई दर कमीच करायचा असेल तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा. शेतकऱ्यांच्या शेतमालावरच तुमचा डोळा का ? असा संतप्त सवाल स्वाभिमानीने केंद्र सरकारला विचारला.