नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बीड/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. बीड लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे तर वंचितकडून अशोक हिंगे पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे. अशोक हिंगे पाटलांना बळ देण्यासाठी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची अंबाजोगाई येथे भव्य परिवर्तन सभा झाली. या सभेत प्रकाश आंबेडकर यांना ऐकण्यासाठी नागरिकांचा जनसागर उसळला होता.
“गेल्या १० वर्षात देशातील ८४ हजार शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केल्या याची बातमी कुठेही आली नाही. यापैकी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदी यांनी किती मदत दिली याची माहिती द्यावी” असा घणाघात अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या सभेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, उमेदवार अशोक हिंगे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले “पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय आहे. मात्र ते आता वसुलीचे कार्यालय झाले आहे. राजकारणात नीतिमत्तेची फार मोठी किंमत आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राजकारणात कुठेही नीतिमत्ता दिसत नाही असं म्हणत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची बांधिलकी नाही, ज्याला नीतिमत्ता नाही तो त्याच्या फायद्यासाठी काम करणार असं म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर हल्लाबोल केला. मोदी असं म्हणतात कि माझ्या कालावधीत काहीच करप्शन झालं नाही.”
“काँग्रेसने लिस्ट काढली त्या लिस्ट मध्ये किती ठिकाणी करप्शन झाले याची लिस्ट काँग्रेसने दिली. तीच लिस्ट प्रकाश आंबेडकर यांनी जनतेसमोर वाचून दाखवली. महागाई बरोबर बेरोजगारी वाढली, मोदींमुळे सगळं देशोधडीला लागले. हे चोरांचे, व्यापाऱ्यांचे, लुटेऱ्यांचे सरकार आहे. शासन राज्य करण्यासाठी नाही तर तोडमोड करण्यासाठी आहे. अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासाठी राजकीय भूमिका घेणं अवघड झालं आहे. इथल्या गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही काळाची गरज आहे. शरद पवारांना देखील मी भूमिका घेण्यासाठी सांगितले होते असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे बीड मतदार संघाचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी देखील अनेक सामाजिक प्रश्नांनावर उजाळा टाकत सरकारला टोला लगावला. “जातीपातीचे नाहीतर विकासाचे राजकारण करणार, महाविकास आघाडी व महायुती हे दोघे एकच आहेत, त्यांना धडा शिकवण्यासाठी मला प्रकाश आंबेडकर यांनी बीड लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मराठा आरक्षण तसेच मुस्लिम, धनगर,आरक्षण प्रश्नावर आपण अगोदरही भूमिका घेतली आहे. यापुढेही भूमिका घेऊन आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून मला लोकसभेत पाठवा.”
अंबाजोगाई येथे पार पडलेल्या वंचिटच् सभेला उपस्थित मान्यवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर,बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील, जिल्हाध्यक्ष अध्यक्ष शैलेश कांबळे, मिलिंद घाडगे,पंजाबराव डक, विष्णु जाधव, डॉ.धर्मराज चव्हाण,महेश निनाळे,तय्यब खान,बिबीशन चाटे, खाजामिया पठान, बाबुराव मस्के, विष्णु देवकाते वैभव स्वामी,डॉ.नितिन सोनवणे, प्रा. छाया हिरवे,अँड अनिता चक्रे, पुष्पाताई तुरूकमारे, यूनुस शेख, पुरुषोत्तम वीर, सुरेश पोतदार, धम्मनंद साळवे, सचिन उजगरे,अंकुश जाधव, रानबा उजगरे, बालाजी जगतकर, अजय सरवदे, बालासाहेब जगतकर,गौतम आगळे, प्रसन्नजित रोडे, चंद्रकांत खरात, रोहन मगर, पुर्वचे जिल्हा तालुका व शह ,समता सैनिक, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे पदाधिकारी उपस्थित होते.