नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली – एप्रिल 2022 मध्ये भारतात एकूण कोळशाचे उत्पादन 661.54 लाख टन इतके झाले.त्यापैकी कोल इंडिया लिमिटेड (CIL)आणि तिच्या उपकंपन्यांनी 534.7 लाख टन कोळशाचे उत्पादन केले, तर सिंगारेनी कोलियारीज कंपनी लिमिटेड (SCCL) ने 53.23 लाख टन कोळशाचे उत्पादन केले आणि बंदिस्त खाणींमधून गेल्या महिन्यात झालेले उत्पादन 73.61 लाख टन इतके होते.
कोळसा मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, या महिन्यात कोळशाची एकूण आवक 708.68 लाख टन होती, तर उर्जा क्षेत्रातील आवक एप्रिलमध्ये 617.2 लाख टनांवर पोहोचली. त्याच वेळी, एकट्या कोल इंडियाकडून ऊर्जा क्षेत्रासाठी 497.39 लाख टन इतकी आवक झाली.
कोल इंडियाने या वर्षी एप्रिलमध्ये सर्वाधिक 534.7 लाख टन उत्पादन केले असून त्यात 6.02 टक्के वाढ दर्शविली आहे.यापूर्वीचे सर्वोच्च उत्पादन एप्रिल 2019 मध्ये 450.29 लाख टन उत्पादन इतके होते. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये केवळ कोल इंडिया मधून झालेली कोळशाची आवक 570.55 लाख टन इतकी होती.यापूर्वीची सर्वाधिक आवक एप्रिल 2021 मध्ये 540.12 लाख टन इतकी नोंदवली गेली होती.
2021-22 या आर्थिक वर्षात एकूण कोळसा उत्पादन 7770.23 लाख टन (तात्पुरती आकडेवारी) झाले,ज्यात गतवर्षी पेक्षा 8.55 टक्के वाढ नोंदवली गेली आहे,तर 2020-21 मधील आवक 7160 लाख टन इतकी होती. कोल इंडिया लिमिटेड (CIL) चे उत्पादन 2020-21 मधील 4.43 टक्क्यांची वाढ दर्शवित 5960.24 लाख टन वरून 2021-22 या आर्थिक वर्षात 6220.64 लाख टन झाले आहे.
सिंगारेनी कोलियारीज कंपनी लिमिटेड (SCCL) ने 2021-22 मध्ये 28.55 टक्के वाढीसह 650.02 लाख टन उत्पादन केले; जे मागील वर्षी 500.58 लाख टन होते. बंदिस्त खाणींतील कोळसा उत्पादन 890.57 लाख टन झाले आहे ;जे 2020-21 मध्ये केवळ 690.18 लाख टन होते.
2021-22 मध्ये एकूण 8180.04 लाख टन कोळशाची आवक झाली आहे जी मागील वर्षी 6900.71 लाख टन होती, यावर्षी त्यात 18.43 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत, सीआयएलने 2020-21 च्या 5730.80 लाख टन कोळशाच्या तुलनेत यावर्षी 6610.85 लाख टन कोळसा पाठवला आहे.