प्रतिनिधी.
भिवंडी – दिनांक १५/८/२०२० रोजी गुन्हे शाखा युनिट- ३ कल्याण चेे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.संजू जॉन यांना गुप्त माहिती मिळाली की भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा बिल्डिंगचे मागे एका महिलेला तिचे प्रियकराने जीवे मारले आहे व तो इसम डाेबिंवली पश्चिम भागात फिरत आहे अशी माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांनी तात्काळ स.पो.नि.भूषण दायमा,पो.उप.निरी.नितीन मुदगुन, पो.हवा.दत्ताराम भोसले यांना बातमीची शहानिशा करून पुढील कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करून आदेश केले त्या अनुषंगाने कोनगाव पोस्टे येथेे संपर्क साधला असता दिनांक १२/८/२०२० रोजी १५:३० वा. दरम्यान मुंबई नाशिक हायवेलगत टाटा आमंत्रा बिल्डिंगचे मेन गेटपासून ५० मीटर अंतरावर झाडाझुडपात एका अनोळखी महिलेचा मृतदेह छोट्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे.सदर प्रकरणी भिवंडी कोनगाव पो.स्टेे.येथे (ADR) अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर २६/२०२० सी.आर.पी .सी १७४ प्रमाणे दि.१२/८/२०२० रोजी दाखल आहे अशी माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांनी वरिष्ठांना माहिती कालवून एक पथक स.पो.नि.भूषण दायमा,पो.उप.निरी.नितीन मुदगुन,पो.हवा. दत्ताराम भाेसले,राजेंद्र घाेलप,राजेंद्र खिल्लारे, मंगेश शिर्के,अजित राजपुत सुरेश निकुळे,बाळा पाटील, हरीचंद्र बंगारा,राहुल ईशी असे पथक डाेबिंवली पश्चिम भागात रवाना केले. सदर पथकाने डोंबिवली पश्चिम भागात जाऊन रेल्वे स्टेशन परिसर,गुप्ते रोड,बागशाळा मैदान असा परिसर पिंजून काढला शेवटी कोपर ब्रिजजवळ एक इसम बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे संशयास्पद स्थितीत फिरताना दिसून आला त्याला पोलिसांचा संशय येताच पळू लागला असता त्यास पोलिस पथकाने पाठलाग करून पकडले व ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सत्य बाहेर आले
दीपक जगन्नाथ रुपवते, वय ३१ वर्षे राहणार-गोविंदवाडी कल्याण पश्चिम पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कसून चौकशी विचारपूस केली असता त्याने त्याची प्रेयसी- किरण सावळे राहणार – चंदनशिव नगर वाडेघर गाव,कल्याण पश्चिम हिस लग्नाला नकार देत असल्या कारणामुळे दिनांक ९ /८ /२०२० रोजी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास फडके मेैदान कल्याण येथून भिवंडी बायपास येथे प्रवासी रिक्षाने आणून टाटा आमंत्रा बिल्डिंगचे जवळ मुंबई नाशिक हायवेलगत झाडी झुडपात नेऊन प्रेम प्रकरणातून उद्भवलेल्या वादातून ओढणीने गळा आवळून जीवे ठार मारून तिला ओढणीसह झाडाला लटकवुुन तिने आत्महत्या केली आहे असा देखावा बनवुन तेथून निघून गेला असे निष्पन्न झाले
अशा प्रकारे गुन्हे शाखा युनिट-3 कल्याणचे पोलिसांनी आत्महत्या केल्याचा बनाव केलेल्या प्रकरणाचा शिताफीने तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला सदर आरोपी विरुद्ध कोनगाव पो.स्टे. गुन्हा रजिस्टर नंबर २०१/२०२० भा.द.वि.कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाई करिता कोनगाव पो.स्टे.यांचे ताब्यात देण्यात आले आहे
सदरची कारवाई मा.पोलिस आयुक्त सो. श्री.विवेक फणसाळकर सो.मा.सह.पोलीस आयुक्त श्री.सुरेश मेकला सो.मा.अप्पर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) श्री. प्रवीण पवार सो.मा. पोलीस उप आयुक्त ( गुन्हे )श्री.दिपक देवराज सो. मा.सहा.पोलीस आयुक्त ( शाेेध- १) गुन्हे शाखा श्री.किसन गवळी सो.यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक -३, कल्याण गुन्हे शाखा युनिट-3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन, स.पो.नि.भूषण दायमा,पो.उप.निरी.नितीन मुदगुन, पो.हवालदार-दत्ताराम भाेसले, राजेंद्र घाेलप, राजेंद्र खिल्लारे,मंगेश शिर्के,अजित राजपुत, सुरेश निकुळे,बाळा पाटील,हरीचंद्र बंगारा,राहुल ईशी यांनी केली आहे. सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आल्याने गुन्हे शाखा युनिट-3 कल्याण पोलिसांचे नागरिकांन कडून सर्वत्र कौतुक होत आहे.