नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
जळगाव/प्रतिनिधी – चोपडा शहरात आज दुपारी चार चाकी वाहनातून तीन जण अन्न व औषध विभागाचे अधिकारी नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादीने एका गुटखा विक्रेत्याला चोरून लपून गुटख्याची विक्री करीत असल्याने कारवाई करण्याची भीती दाखवून त्याच्याकडून पाच लाखाची मागणी केली. यावरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला तीन जणांनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
त्यातील एक जण फरार झालेला आहे, तर दोन जण सोलापूर जिल्ह्याचे आहेत, यातील एक जण पोलीस विभागात असल्याचं त्याच्याकडे ओळखपत्र मिळालं आहे. त्यासंदर्भात दूरध्वनी वरुन माहिती समजली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुमार सावळे यांनी सांगितले. सदर या प्रकरणांमध्ये सविस्तर तपास केल्यास मोठे मासे जाळ्यात अटकण्याची शक्यता चर्चेत येत आहे. सदर दोन जणांना व चार चाकी वाहन चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुमार साबळे करीत आहे.