नेशन न्यूज मराठी टीम.
वर्धा/प्रतिनिधी – राष्ट्रीय संयोजक भारत जोडो अभियान व स्वराज अभियान योगेंद्र यादव हे वर्ध्यात आले असता त्यांनी एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर कडाडून टीका केली. 2014 पासून आणि विशेषतः 2019 नंतर देशामध्ये लोकतंत्र्याच्या ढाच्यावर हल्ले केले जाते आहे. सत्ते मध्ये बसलेले लोक लोकतंत्र्याचा गळा दाबत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी सरकारवर केला.
ज्या ज्या व्यक्तींचे देशावर प्रेम आहे त्यांनी देश वाचविण्यासाठी एकत्र आले पाहजे, संविधान वाचविण्यासाठी एकत्र आले पाहिजे.लोकतंत्र्य वाचविण्यासाठी एकत्र आले पाहिजे. हे सरकार घराला आग लाऊन त्यावर आपल्या पोळ्या भाजत आहे त्यामुळे देशाला वाचवायचं असेल तर बीजेपी आणि आरएसएसच्या सत्तेला हरवलं पाहिजे, असे आवाहनही देशाच्या जनतेला योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक भारत जोडो अभियान व स्वराज अभियान यांनी यावेळी केले.