नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील कोल्हापुरात झालेल्या दंगलीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, राज्य सरकार या दंगली घडवून आणत आहे. प्रत्येक प्रयत्नात सरकार अपयशी ठरल्याने सरकार असे कृत्य करत आहेत. कायदा सुव्यवस्था राखता येत नसेल तर सरकारने तातडीने पायउतार व्हावे.
आत्तापर्यंतची महाराष्ट्रातील ही 10वी घटना आहे. कोल्हापुरातील दोन जणांनी डीपी ठेवला होती, तेव्हाच मुस्लिम समाजाच्या वतीने कारवाई करण्यात आली. आज कोल्हापुरातील धार्मिक तणाव मुंबईसह कोल्हापूरचे वातावरण बिघडवत आहेत. घडलेल्या बलात्काराच्या घटनेचे कारण देत काँग्रेस प्रदेशआध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची राजीनाम्याची मागणी केली आहे.
Related Posts
युद्ध बंदीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ? ॲड. प्रकाश आंबेडकर