नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १०२ वर्षापूर्वी सुरु केलेलं मूकनायक पाक्षिक मराठी पत्रकारितेतील ऐतिहासिक परंपरेची स्थापना करणारी घटना ठरली. मूकनायकचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी मुंबईत प्रकाशित करण्यात आला. आपल्या चळवळीची भूमिका आणि आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी वृत्तपत्राची गरज असल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आलं होतं. त्या भूमिकेतूनचं बाबासाहेबांनी मूकनायक पाक्षिकाची सुरुवात केली.मूकनायकाच्या याच धरतीवर दि. १५ मे २०२२ रोजी कल्याण तालुक्यात मूकनायक ते प्रबुद्ध भारत टीम द्वारा आंबेडकरी पत्रकारितेचा वैचारिक जागर घालण्यात आला.
प्रसार माध्यमांनी एखादी स्टोरी वर केलेली मांडणी योग्य असावी. राजकीय पक्षाच्या भांडणात सामाजिक प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असून या भांडणात समाजाचे प्रश्न मांडण्याचे महत्त्वाचे ठरणार असल्याचे सुजात यांनी स्पष्ट केले. कंगना रणावत सुशांत सिंग प्रकरणात करोना काळात रेमेडीसिवर या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगत अदानी अंबानी या उद्योगपतीं इतका पैसा आपल्याकडे नसून त्यासाठी प्रबुद्ध भारत सारखं माध्यम आपल्याकडे हवे असल्याचे डॉ. बाबासाहेबांनी शंभर वर्षापूर्वी सांगितल्याची आठवण सुजात यांनी करून दिली.
राजकीय नेत्यांची परस्परविरोधी भांडण याचा प्रसार माध्यमे ते दाखविण्याचे व रेखाटण्याचे प्रकार करीत असून या भांडणात सामाजिक ज्वलंत प्रश्नाकडे माध्यमांचे दुर्लक्ष होत चालल्याचे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले.
पत्रकारांनी शरद पवार यांच्यावर झालेल्या टिपणी बाबत विचरले असता, शरद पवार यांच्यावर केली गेलेली टिपणी अशोभनीय असून देशभरात त्यांच्याबद्दल आदर असल्याचे सुजात यांनी सांगून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल तर भूमिकांवर धोरण व राजकारणावर टीका करा मात्र कोणाच्या अंगावर दिसण्यावर टीका करू नये. जगभरातील कॅन्सर रुग्णांसाठी पवार प्रेरणास्थान असून कॅन्सरवर मात करीत ते या वयातही बोलतात, लोकांना भेटतात, भाषण करतात त्यामुळे अशा नेत्यांबद्दल बोलणं चुकीचे असल्याचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सुजात प्रकाश आंबेडकर, प्रबुद्ध भारतचे वृत्तसंपादक जितरत्न पटाईत, फिल्ममेकर सोमनाथ वाघमारे हे उपस्थित होते.यावेळी झालेल्या कविसंमेलनात संविधान गांगुर्डे, अनिल शिंदे आणि नवनाथ रानखांबे हे सहभागी झाले आणि शाहिर मेघानंद जाधव यांच्या वादळवारा कार्यक्रमही रंगतदार ठरला.सोबत सुर नवा ध्यास नवा उपविजेता अमोल घोडके यांनी उपस्थिती लावली.कार्यक्रमात चित्रकार (Artist) किर्तीराज, पूजा कदम आणि सुनील अवचार यांच्या कलाकृतीचेही मुख्य आकर्षण होते.
तसेच मूकनायक ते प्रबुद्ध भारत टीम तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजेत्यांना सुजात आंबेडकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित कमलेश उबाळे, सूत्रसंचालन स्नेहल सोहनी तर आभार रोहित डोळस यांनी मांडले.सदर कार्यक्रमाला आंबेडकरी अनुयायींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण मेश्राम, रोहित डोळस, हर्षद बोले, तुषार माळवी, आदित्य कांबळे, बाळासाहेब म्हस्के,अनिल शिंदे,रुपेश हुंबरे यासोबत कल्याण मधील आंबेडकरी तरुणांनी सहकार्य केलं. तसेच राज्य भरातून आलेले विकी जाधव, ब्रिजेश इंगळे,स्वप्नील जवळगेकर,विकी चवरे,शुकलोधन गायकवाड,अक्षय बनसोडे,अनिल म्हस्के त्यांचे ही मनापासून आभार.