नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – नागरिकांना आधार ओळख प्लॅटफॉर्म तसेच आणि विविध सेवांचा लाभ घेण्यात मदत करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) ने सातत्याने प्रयत्न केले आहेत. या वर्षी युआयडीएआयने मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये “आधार #ऑथटिकेशनची पुनर्कल्पना” या संकल्पनेअंतर्गत संपूर्णपणे देशात विकसित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एमएल इंजिनच्या मदतीने सुधारित फेस ऑथेंटिकेशन सुविधा प्रदर्शित केली. 2022 च्या स्वेच्छा मार्गदर्शक तत्त्वांतर्गत, युआयडीएआय तंत्रज्ञानाचा जलद अवलंब करण्यास सक्षम बनवण्यासाठी आणि रहिवाशांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.उत्तम उपाय शोधण्याच्या उद्देशासह उद्योग आणि फिनटेक भागीदारांना युआयडीएआय सोबत सहकार्य करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
या धोरणांतर्गत युआयडीएआयने चेहरा प्रमाणीकरणाबाबत नागरिकांचा अनुभव सुधारण्यासाठी एअरटेल पेमेंट्स बँकेबरोबर गेल्या काही महिन्यांपासून काम केले आहे. फसवणुकीचा शोध आणि प्रतिबंधक यंत्रणाचे उत्तम प्रकारे एकत्रीकरण करताना कमी प्रकाशात अधिक प्रभावी फोटो सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही चमूंनी एकत्रित काम केल्यामुळे हे शक्य झाले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा ) च्या लाभार्थ्यांसाठी उपस्थिती प्रणाली आणि बँकांद्वारे ग्राहक अधिग्रहण प्रक्रिया सारख्या भागीदार उपयोग – प्रकरणे देखील प्रदर्शित करण्यात आली.
ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल 2023 चा एक भाग म्हणून,युआयडीएआयने सहकार्य , सह-नवोन्मेष आणि व्यापक अवलंब या दृष्टीने संधींचा शोध घेण्याच्या उद्देशाने विविध फिनटेक कंपन्यांचे अधिकारी आणि संबंधित व्यवस्थेतील भागीदारांसह “ रिइमॅजिन आधार #टगेदर” या संकल्पनेअंतर्गत उद्योगांबरोबर बैठक देखील घेतली.
नागरिकांसाठी आधारचा सुरक्षित, वेगवान आणि सर्वसमावेशक वापर सुनिश्चित करण्यासाठी सर्व शैक्षणिक आणि उद्योग भागीदारांना एकत्रितपणे काम करण्यास प्रोत्साहित करण्याच्या दिशेने युआयडीएआय टीमने टाकलेले हे आणखी एक पाऊल होते.